आता ठाण्यात भाजपला महापौर पद हवे...! मुंबईच्या दबावतंत्रावर डावखरेंनी डाव टाकला, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:25 IST2026-01-19T12:24:28+5:302026-01-19T12:25:09+5:30

Shinde Sena vs BJP Thane municipal result news 2026: ठाणे महापौरपदावरून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी शिंदे सेनेला इशारा दिला आहे. २ वर्षांसाठी महापौरपद हवे, अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.

Thane municipal result news 2026: Now BJP wants the mayor's post in Thane...! The leftists have made a move on Mumbai's pressure tactics, otherwise... | आता ठाण्यात भाजपला महापौर पद हवे...! मुंबईच्या दबावतंत्रावर डावखरेंनी डाव टाकला, अन्यथा...

आता ठाण्यात भाजपला महापौर पद हवे...! मुंबईच्या दबावतंत्रावर डावखरेंनी डाव टाकला, अन्यथा...

ठाणे: मुंबईतील महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगलेला असतानाच आता ठाण्यातही सत्तावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. "ठाणे महानगरपालिकेत भाजपला किमान दोन वर्षांसाठी महापौरपद मिळावे, अन्यथा आम्ही सत्तेत न राहता थेट विरोधी बाकावर बसू," असा खळबळजनक इशारा भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे. मुंबईतील राजकीय दबावतंत्राला उत्तर म्हणून डावखरेंनी ठाण्यात हा मोठा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठाण्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना निरंजन डावखरे म्हणाले की, "शीळ ते वडवली या पट्ट्यात भाजपने अत्यंत प्रभावी काम केले आहे. आम्हाला ज्या जागा वाट्याला आल्या, तिथे आम्ही १०० टक्के 'स्ट्राईक रेट' राखला आहे. आमची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ठाण्याचा महापौर भाजपचा असावा."

शिंदे सेनेसमोर पेच; ठाण्यात युती धोक्यात? 
सध्या ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे (शिंदे गट) बहुमत आहे. मात्र, सत्ता राखण्यासाठी भाजपची साथ महत्त्वाची आहे. "बहुमत त्यांच्याकडे असले तरी आमचा सन्मान झाला पाहिजे. दोन वर्षांसाठी महापौरपद हा आमचा हक्क आहे," असे म्हणत डावखरेंनी थेट विरोधात बसण्याची धमकी दिली आहे. यामुळे आगामी काळात ठाण्यातील 'युती'मध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईच्या राजकारणाचे पडसाद? 
मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू असताना, ठाण्यातही भाजपने आपला दावा ठोकून मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता शिंदे सेना यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : भाजपा की ठाणे महापौर पद की मांग, गठबंधन से बाहर निकलने की धमकी

Web Summary : भाजपा के निरंजन डावखरे ने दो साल के लिए ठाणे महापौर पद की मांग की है, शिंदे की शिवसेना से समर्थन वापस लेने की धमकी दी है। यह मांग मुंबई के राजनीतिक घटनाक्रमों के बाद आई है, जिससे ठाणे गठबंधन पर तनाव बढ़ सकता है और सीएम शिंदे पर दबाव बढ़ सकता है।

Web Title : BJP Demands Thane Mayor Post, Threatens to Exit Alliance

Web Summary : BJP's Niranjan Davkhare demands Thane mayor post for two years, threatening to withdraw support from Shinde's Shiv Sena. This demand follows Mumbai's political developments, potentially straining the Thane alliance and increasing pressure on CM Shinde.