ठळक मुद्देया आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे मुख्य भूमिका साकारत आहेत. 

या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. पण आता तिने या मालिकेला रामराम ठोकला असून तिची जागा इशा केसकरने घेतली आहे. रसिकाने मालिका सोडल्यानंतर त्याचा या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटले होते. पण रसिकाच्या एक्झिटनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या सगळ्यात पसंतीची मालिका आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या क्रमांकावर राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरची मुख्य भूमिका आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 

तिसऱ्या स्थानावर चला हवा येऊ द्या व्हायरल असून चौथ्या क्रमांकावर सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची तुला पाहते रे ही मालिका आहे. तुला पाहते रे या मालिकेत नुकतीच शिल्पा तुळसकरची एंट्री झाली असून प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक चांगलाच आवडत आहे. 

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. 

 

English summary :
TRP Report: According to the report by Broadcast Audience Research Council India, Swarajya Rakshak Sambhaji is ranked fifth on the list this week and mazya navryachi bayko serial is in the first place.


Web Title: Zee Marathi's Mazya Navryachi Bayko is no one one TRp Chart
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.