या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 01:25 PM2019-09-28T13:25:25+5:302019-09-28T13:28:44+5:30

यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नव-याची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळाली.

ZEE MARATHI AWARDS 2019 Nominations | या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी

या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बहीण-भाऊ, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकन जाहीर करण्यात आली.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणत्या कुटुंबाला नामांकन मिळेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. मुख्य पुरस्कार सोहळ्या इतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो हा नामांकनाचा सोहळा. यंदा प्रेक्षकांची लाडकी वाहिनी झी मराठी हिने २० वर्षे पूर्ण केली त्यामुळे या सेलिब्रेशनला एक वेगळीच रंगत होती. एका विशिष्ट थीमवर आधारित असलेल्या या सोहळ्याची यावर्षी ‘ग्लॅमरस स्ट्राईप्स’ अशी थिम होती.

झी मराठी अवॉर्ड्स २०१९ ची नॉमिनेशन पार्टी शुक्रवारी मुंबईत पार पडली. या पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी ग्लॅमरस स्ट्राईप्स या थिम अनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चला हवा येऊ द्या मधील डॉक्टर निलेश साबळे आणि सगळ्यांची लाडकी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी केले. यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नव-याची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बहीण-भाऊ, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकन जाहीर करण्यात आली.

या नामांकन सोहळ्यात अभिजीत खांडकेकर, अनिता दाते-केळकर, ईशा केसकर, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, धनश्री काडगांवकर, चेतन वडनेरे, शिवानी बावकर, अतुल परचुरे, दीप्ती केतकर, तेजश्री प्रधान यांच्यासह झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील सर्व कलाकारांची उपस्थिती होती. पार्टीत सर्वच सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे लवकर कळेल. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्यांना वोट करून जिंकवू शकतात.


सर्वोत्कृष्ट अभिनेता
अभिजीत राजे (अग्गंबाई सासूबाई)
समर (मिसेस मुख्यमंत्री)
मोहन (भागो मोहन प्यारे)
अलंकार (आटली पाटली)
राणा (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सुम्मी ((मिसेस मुख्यमंत्री)
अंजली (तुझ्यात जीव रंगला)
राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट बहीण-भाऊ
राणा-सुरज (तुझ्यात जीव रंगला)
बबन-सुम्मी (मिसेस मुख्यमंत्री)
बरकत-अंजली (तुझ्यात जीव रंगला)
मोहन-दादा (भागो मोहन प्यारे)

सर्वोत्कृष्ट जोडी
पल्लवी-अलंकार (आटली पाटली)
सुम्मी-समर (मिसेस मुख्यमंत्री)
आरावरी-अभिजीत (अग्गंबाई सासूबाई)
गोडबोले बाई-मोहन (भागो मोहन प्यारे)
अंजली-राणा (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट कुटुंब
समर मंत्रापाटील (मिसेस मुख्यमंत्री
गायकवाड (तुझ्यात जीव रंगला)
सुभेदार (माझ्या नवऱ्याची बायको)
कुलकर्णी (अग्गंबाई सासूबाई)
नाईक (रात्रीस खेळ चाले 2)

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
होम मिनिस्टर
आम्ही सारे खव्वये
राम राम महाराष्ट्र
सर्वोत्कृष्ट मालिका

सर्वोत्कृष्ट खलनायिका
अनुराधा (मिसेस मुख्यमंत्री)
शनाया (माझ्या नवऱ्याची बायको)
वच्छी (रात्रीस खेळ चाले 2)
नंदिता (तुझ्यात जीव रंगला)
मधुवंती (भागो मोहन प्यारे)
प्रज्ञा (अग्गंबाई सासूबाई)

सर्वात्कृष्ट खलनायक
पप्या (तुझ्यात जीव रंगला)
मदन म्हात्रे (जागो मोहन प्यारे)
अन्ना नाईक (रात्रीस खेळ चाले 2)
गुरूनाथ (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट सहकलाकार (स्त्री)
रेवती (माझ्या नवऱ्याची बायको)
वच्छी (रात्रीस खेळ चाले 2)
सरिता (रात्रीस खेळ चाले 2)
छाया (रात्रीस खेळ चाले 2)
सुलभा (अग्गंबाई सासूबाई)
शोभा (रात्रीस खेळ चाले 2)
जेनी (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट सहकलाकार (पुरुष)
काशी (रात्रीस खेळ चाले 2)
मामा (मिसेस मुख्यमंत्री)
पप्या (तुझ्यात जीव रंगला)
चोंट्या (रात्रीस खेळ चाले 2)
आनंद (माझ्या नवऱ्याची बायको)
सोहम (अग्गंबाई सासूबाई)
सुरज (तुझ्यात जीव रंगला)


सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री)
आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
शेवंता (रात्रीस खेळ चाले 2)
सुम्मी (मिसेस मुख्यमंत्री)
शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई)
शनाया (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला)
अभिजीत राजे (अग्गंबाई सासूबाई)
मोहन (भागो मोहन प्यारे)
अण्णा (रात्रीस खेळ चाले 2)
गुरूनाथ (माझ्या नवऱ्याची बायको)
आजोबा (अग्गंबाई सासूबाई)
सुमीत्रा (माझ्या नवऱ्याची बायको)
बबन (मिसेस मुख्यमंत्री)

सर्वोत्कृष्ट आई
गोदाक्का (तुझ्यात जीव रंगला)
राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
माई (रात्रीस खेळ चाले 2)
अनुराधा (मिसेस मुख्यमंत्री)

सर्वोत्कृष्ट वडील
सुरेश (मिसेस मुख्यमंत्री)
प्रतापराव (तुझ्यात जीव रंगला)
गुरूनाथचे वडील (माझ्या नवऱ्याची बायको)
शेरसिंग (मिसेस मुख्यमंत्री)

सर्वोत्कृष्ट सून
सरिता (रात्रीस खेळ चाले2)
सुम्मी (मिसेस मुख्यमंत्री)
राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई)
अंजली (तुझ्या जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट सासू
माई (रात्रीस खेळ चाले 2)
राधिकाची सासू (माझ्या नवऱ्याची बायको)
आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
अनुराधा (मिसेस मुख्यमंत्री)

सर्वोत्कृष्ट सासरे
प्रतारराव (तुझ्यात जीव रंगला)
अण्णा (रात्रीस खेळ चाले 2)
राधिकाचे सासरे (माझ्या नवऱ्याची बायको)
आजोबा (अग्गंबाई सासूबाई)
शेरसिंग (मिसेस मुख्यमंत्री)

सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (पुरुष)
बबन (मिसेस मुख्यमंत्री)
सुरेश (मिसेस मुख्यमंत्री)
लक्ष्मण (मिसेस मुख्यमंत्री)
मोहन (भागो मोहन प्यारे)
मामा (मिसेस मुख्यमंत्री)
पोपट (माझ्या नवऱ्याची बायको)
चोंट्या (रात्रीस खेळ चाले 2)

सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (स्त्री)
सुलक्षणा (माझ्या नवऱ्याची बायको)
कमीनी लंके (भागो मोहन प्यारे)
चंदा (तुझ्यात जीव रंगला)
मंदी (अग्गंबाई सासूबाई)
प्रज्ञा (अग्गंबाई सासूबाई)
शनाया (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार
छोटा पांडू (रात्रीस खेळ चाले 2)
छोटा अभिराम (रात्रीस खेळ चाले 2)
लाडू (तुझ्यात जीव रंगला)
अर्थव (माझ्या नवऱ्याची बायको)
छोटी छाया (रात्रीस खेळ चाले 2)
छोटा दत्ता (रात्रीस खेळ चाले 2)
छोटा माधव (रात्रीस खेळ चाले 2)

सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतं
मिसेस मुख्यमंत्री
तुझ्यात जीव रंगला
अग्गंबाई सासूबाई
भागो मोहन प्यारे
अल्टी पल्टी
रात्रीस खेळ चाले 2


 

Web Title: ZEE MARATHI AWARDS 2019 Nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.