ठळक मुद्देख-या आयुष्यातही लियाना प्रचंड ग्लॅमरस आहे.

‘लग्नाची वाईफ वेडींगची बायकू’ ही नवी मालिका सध्या टीव्हीवर धूम करतेय. झी टीव्हीवरची ही मालिका अवघ्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. एक नवरा आणि दोन बायका या विषयाभोवती फिरणारी ही मालिका. खरे तर या विषयावरचे अनेक चित्रपट, मालिका यापूर्वीही आपण पाहिल्यात. पण ‘लग्नाची वाईफ वेडींगची बायकू’ या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील ठसकेबाज ग्रामीण अंदाज आणि नवोदित कलाकार.  या मालिकेमध्ये विजय आंदळकर याने मुख्य अभिनेत्याची म्हणजेच मदनची भूमिका साकारली आहे. हिंगणगावचा मदन त्याची गावरान ठसकेबाज बायको आणि त्यात ही लंडनची पाहुणी असा सगळा सावळा गोंधळ मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे.


या मालिकेतील ‘इंग्लंडची राणी’ अर्थात ‘विदेशी डॉल’ मारिया सध्या जाम चर्चेत आहे. आज तिच्याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, ‘लग्नाची वाईफ वेडींगची बायकू’ मालिकेत फॉरेन गर्लची भूमिका साकारणा-या या अभिनेत्रीचे नाव आहे लियाना आनंद. लियानाची ही पहिली मालिका आहे.


 मालिकेतील तिचा ग्लॅमरस अंदाज आणि विदेशी तोरा विशेष लक्षवेधी आहे. अलीकड झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात लियाना दिसली होती. ख-या आयुष्यातही लियाना प्रचंड ग्लॅमरस आहे. पाहा, लियानाचे काही ग्लॅमरस फोटो...


 

Web Title: zee mararthi serial laganchi wife weddingchi baykoo star leeana aannad pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.