Indian Idol 12चा विजेता पवनदीप राजनच्या संपत्तीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:25 PM2021-09-22T12:25:04+5:302021-09-22T12:25:36+5:30

इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर पवनदीपच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे समजते आहे.

You will be amazed to read the wealth figure of Indian Idol 12 winner Pawandeep Rajan | Indian Idol 12चा विजेता पवनदीप राजनच्या संपत्तीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

Indian Idol 12चा विजेता पवनदीप राजनच्या संपत्तीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

googlenewsNext

इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन खूप चर्चेत आला होता. या सीझनचा विजेता पवनदीप राजन ठरला. त्याने आपल्या सुरेल आवाजाने सर्वांनाच भुरळ पाडली होती. मुळचा उत्तराखंडचा असलेल्या पवनदीप राजनने पहाडी गाण्यातून फक्त उत्तराखंडच्याच लोकांनाच नव्हे तर देशभरातील लोकांना त्याच्या आवाजाने वेड लावले आहे. इंडियन आयडॉल संपल्यानंतरही आज देखील सोशल मीडियावर त्याचे गाणे सतत पाहिले आणि ऐकले जाते. इतकेच नाही तर त्याचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप मोठा आहे. 

इंडियन आयडॉलनंतर पवनदीपच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच त्याच्या संपत्तीमध्ये देखील खूप वाढ झाल्याचे समजते आहे. इंडियन आयडॉलनंतर पवनदीपला नवीन संधी मिळत आहेत. त्यामुळे त्याच्या आर्थिक संपत्तीतदेखील मोठी वाढ झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पवनदीपकडे जवळपास १ मिलियन डॉलर ते २ मिलियन डॉलरपर्यंत संपत्ती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पवनदीपचे मानधन जवळपास १० ते २० लाख रूपये आहे.

विशेष बाब म्हणजे पवनदीप एक रॉयल आयुष्य जगतो. इतकेच नाही तर  त्याच्याकडे महिंद्रा एक्सयुव्ही ५०० ही लक्झरी कार देखील आहे. पवनदीपची लोकप्रियता पाहून २०१६ मध्ये उत्तराखंड सरकारने त्याला युवा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले.

Web Title: You will be amazed to read the wealth figure of Indian Idol 12 winner Pawandeep Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.