Will Anna stay true to his word and shave off his pride in Sony SAB’s Bhakharwadi | 'भाकरवडी'मधील अण्णा त्यांचे भूषण असलेल्या मिशा कापण्याचे देतात वचन

'भाकरवडी'मधील अण्णा त्यांचे भूषण असलेल्या मिशा कापण्याचे देतात वचन

गुढीपाडवा जवळ आल्यामुळे संपूर्ण कुटुंब नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी व आनंदात सण साजरा करण्यासाठी तयार होत आहे. दिवसभर काम करून आल्यानंतर अण्णा (देवेन भोजानी) गोखले कुटुंबातील नातवंडांसोबत मजा करत असतात. त्याचवेळी बंड्या (अरियन सावंत) आपली आई सुप्रिया हिच्यावर लिहिलेला निबंध वाचून दाखवायला लागतो. सुप्रियाच्या आठवणींमुळे अण्णा लगेच भावूक होतात आणि अभिषेकसोबत (अक्षय केळकर) सुप्रियाचा शोध घ्यायला लागतात. पण, अण्‍णा निराश होऊन घरी परततात आणि कुटुंबियांना सुप्रियाला शोधू न शकल्‍याचे सांगतात. उर्मिला (भक्ती राठोड) अण्णांना कोपरखळी मारतानाच तिने सांगितल्यावर मिशा कापायच्या अण्णांनी दिलेल्या वचनाचीही आठवण करून देते. अण्णा आपला पराभव स्वीकारून त्यांचं भूषण असलेल्या मिशा कापतील का?
देवेन भोजानी (अण्णा) म्हणाले, 'जरी संपूर्ण गोखले कुटुंब गुढीपाडवा साजरा करण्याच्या तयारीत असले तरीही अण्णांच्या मनाला मात्र सुप्रियाच्या आठवणींनी रुखरुख लागून राहिली आहे. अनेकदा प्रयत्न करूनही अण्णांना तिचा ठावठिकाणा सापडलेला नाही. तरीही ही बाब आता अण्णांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे ते एखादे टोकाचे पाऊल उचलतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. आता ही कथा कशी उलगडते याबाबत जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. जे काही घडेल त्याला आमचे प्रेक्षक दाद देतील ही आशा बाळगतो.'

Web Title: Will Anna stay true to his word and shave off his pride in Sony SAB’s Bhakharwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.