Will anna kill shevanta? Ratris khel chale 2 | धक्कादायक! ‘रात्रीस खेळ चाले २’ अण्णांच घेणार का शेवंताचा जीव?

धक्कादायक! ‘रात्रीस खेळ चाले २’ अण्णांच घेणार का शेवंताचा जीव?

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.

सगळ्या वयोगटांमध्ये आज शेवंता आणि अण्णांची चर्चा आहे. सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि शेवंताला दिवस गेले आहेत. त्यामुळे तिची तब्येत जरा नाजूक आहे. अण्णा शेवंताला एक औषध देतात. त्यामुळे शेवंताला घेरी येते. अण्णांपासून शेवंताच्या जीवाला धोका आहे का? शेवंता अण्णांपासून गरोदर असल्यामुळे अण्णा तिचा काटा काढणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Web Title: Will anna kill shevanta? Ratris khel chale 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.