when a contestant kiss on neha kakkar cheek in indian idol show | Indian Idol 11 : ऑडिशनसाठी पोहोचलेल्या स्पर्धकाने नेहा कक्करला आधी मारली मिठी; मग बळजबरीने केले किस

Indian Idol 11 : ऑडिशनसाठी पोहोचलेल्या स्पर्धकाने नेहा कक्करला आधी मारली मिठी; मग बळजबरीने केले किस

ठळक मुद्दे या शोमध्ये नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक परिक्षक म्हणून काम पाहत आहेत.

इंडियन आयडल या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोचा 11 वा सीझन सुरु झाला आहे. सध्या या शोचे ऑडिशन सुरु आहे. शोचे परिक्षक नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक नेहमीप्रमाणे ऑडिशन राऊंडमध्ये मौज मस्ती करताना दिसत आहेत. अनेक स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्सही पाहायला मिळत आहेत. पण याच ऑडिशनदरम्यान असे काही झाले की, परिक्षकांसह प्रेक्षकही अवाक् झालेत. होय, ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकाने काय करावे तर चक्क नेहा कक्करला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला.
सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व स्पर्धकांच्या ऑडिशनची झलक पाहायला मिळत आहे. यातल्या एका व्हिडीओत एक स्पर्धक नेहाला बळजबरीने गालावर किस करताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. 


व्हिडीओत दाखवल्यानुसार, एक स्पर्धक खूप साºया भेटवस्तू घेऊन ऑडिशनसाठी पोहोचतो. आपल्याजवळच्या सगळ्या भेटवस्तू तो नेहाला देता. नेहा खूश होते आणि आनंदाच्या भरात त्याला मिठी मारते. पण तो स्पर्धक अचानक नेहाला गालावर किस करतो. शो होस्ट आदित्य नारायण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. नेहा सुद्धा लगेच बाजूला होते. या घटनेमुळे विशाल व अनु मलिक थक्क होतात. अर्थात यानंतर पुढे काय होते, यासाठी तुम्हाला अख्खा एपिसोड पहावा लागेल. या स्पर्धकाच्या वागण्यावर विशाल व अनु मलिक कसे रिअ‍ॅक्ट करतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.


सोनी टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडीओत अनेक स्पर्धक परफॉर्म करताना दिसत आहेत. एक स्पर्धक त्याच्या प्रवासाबद्दल बोलतोय. 14 वर्षांच्या या स्पर्धकाने आत्तापर्यंत 15 हजार गाणी गायली आहेत.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: when a contestant kiss on neha kakkar cheek in indian idol show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.