''जब मिया बीवी राजी तो क्‍या करेगा काजी?' ईलायची व पंचमच्‍या बाबतीत असेच काहीतरी घडत आहे. रोमँटिक विनोदी मालिका 'जिजाजी छत पर हैं' अखेर सर्वात मोठ्या ट्विस्‍टचा उलगडा करणार आहे. ईलायची व पंचम यांनी एकत्र येण्‍यासाठी अनेक प्रयत्‍न केले आहेत आणि मुरारीपासून मात्र आपले प्रेमप्रकरण लपवले आहे. अखेर या दोघांचेही स्‍वप्‍न सत्‍यात अवतरत आहे. 


ईलायची (हिबा नवाब) आपल्‍या वडिलांप्रती असलेल्‍या आदरामुळे पुष्‍पेंद्रसोबत विवाह करायला होकार देते, ज्‍याला तिच्‍या कुटुंबाने निवडलेले असते. पंचम (निखिल खुराणा) सर्व आशा हरवून जातो. पण तो पिंटू व ईलायचीच्‍या मदतीने नानीला त्‍यांच्‍या एकमेकांप्रती असलेल्‍या प्रेमाबाबत सांगतो. नानी दोघांनाही पूर्णपणे मदत करते. ती त्‍यांना पळून जाऊन विवाह करण्‍याचा सल्‍ला देते. ईलायची व पंचम नानीचा धाडसी सल्‍ला ऐकून अचंबित होतात. ईलायची आता तिचे प्रेम आणि तिच्‍या वडिलांप्रतीचा आदर यांमध्‍ये अडकली आहे. 

 

पण, मुरारी त्‍यांच्‍या विवाहाचा स्‍वीकार करेल का? 


चाहते ईलायची व पंचम या डायनॅमिक जोडीच्‍या विवाहाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेमध्‍ये कथेच्‍या प्रारंभापासून ईलायचीला पंचम अविवाहित असल्‍याचे माहित असते. पण तो विवाहित असल्‍याचे नाटक करत असताना ती काहीच माहीत नसल्‍याचे ढोंग करते. वर्षभर खोडकर ईलायची पंचमला हास्‍यपूर्णरित्‍या संकटात टाकते. त्‍याच्‍याप्रती प्रेम भावना असल्‍यामुळे ती त्‍या संकटांमधून त्‍याची सुटका देखील करायची. 


अखेर पंचम अविवाहित असल्‍याचे ईलायचीसमारे उघडकीस येते, तेव्‍हा ते एकमेकांप्रती असलेले प्रेम व्‍यक्‍त करून प्रेमाची कबूली देतात. आता त्‍यांच्‍या प्रेमाला नवीन नात्‍यात बदलण्‍याची वेळ आली आहे. पण घरातील अनेक अडचणी आणि त्‍यांचे नाते एक मोठे गुपित असल्‍यामुळे त्‍यांनी गुपचूप विवाह करण्‍याचे ठरवले आहे. 
 

Web Title: Wedding bells ahead for Pancham and Elaichi. Will Murari approve?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.