कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन संपून जवळजवळ महिना झाला आहे. मात्र या सीझनची चर्चा अद्याप होताना पाहायला मिळते आहे. याचं कारण आहे यंदाच्या सीझनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचं अफेयर. बिग बॉस मराठी २ च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. त्यांच्या नात्यावर त्यावेळी बरीच टीकादेखील झाली होती. शो संपल्यानंतर रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. पण असं काहीच झालं नाही. उलट ‘बिग बॉस मराठी २’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरू झाला आहे.

बिग बॉस मराठी २ शो संपल्यानंतर आता वीणा आणि शिव यांची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे. वीणा व शिव सगळीकडे एकत्र फिरताना दिसतात. तसेच ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील करत असतात.

काही दिवसांपूर्वी वीणाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत शिव रोमँटिक अंदाजात वीणाला प्रपोज करताना दिसत होता. या फोटोला खूप लाइक्स मिळाले.

शिव आणि वीणा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते. घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला लग्नाविषयी विचारले असता त्याने सांगितले होते की, आता घराबाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे. आता ते दोघे लग्न कधी करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 

Web Title: Veena Jagtap shared photo with Shiv Thackeray, comments on the photo are happening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.