वैभव मांगले अभिनयाव्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 04:51 PM2019-09-03T16:51:21+5:302019-09-03T16:53:58+5:30

 'युवा सिंगर एक नंबर' या कार्यक्रमामुळे त्यांचा हा पैलू सुद्धा प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक कलागुण नुकताच समोर आला आहे.

Vaibhav Mangle Hobby | वैभव मांगले अभिनयाव्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

वैभव मांगले अभिनयाव्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

googlenewsNext

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. यापैकी एक वैभव मांगले जितके उत्तम अभिनय करतात, तेवढीच संगीताचीही उत्तम जाण त्यांना  आहे.  'युवा सिंगर एक नंबर' या कार्यक्रमामुळे त्यांचा हा पैलू सुद्धा प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक कलागुण नुकताच समोर आला आहे. वैभव एक छान चित्रकारही आहेत. त्यांनी काढलेली काही चित्रं नुकतीच सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहेत.

चित्रकलेतील या आवडीविषयी बोलतांना वैभव म्हणाले की, 'शाळेत असताना चित्रकला हा विषय शिकलो होतो. पण, त्यानंतर चित्रकलेशी विशेष संबंध आला नाही. गेल्या काही महिन्यांत मात्र मला असं वाटलं, की आपणही चित्रं काढायला हवीत. सुरुवातीला साधी-सोपी चित्रं काढायला लागलो. मग हळूहळू आणखी दर्जेदार चित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. या सगळ्यामुळे चित्रकलेत माझं मन रमलं. मधल्या काही दिवसांमध्ये मला थोडा फावला वेळ मिळाला. त्यावेळी चित्रकलेला प्राधान्य देत आलं. आता  साधारपणे दिवसातून दोन चित्रं काढून होतात. रिकामा वेळ चित्रकलेसाठी दिल्यामुळे, मी मोबाइलपासून लांब राहतो. त्यामुळेच चित्रकलेत आणि रंगांमध्ये मी अधिक रमतो. 

चित्रकलेच्या आणि विविध रंगछटांच्या सानिध्यात राहणं खूप छान आणि विलोभनीय आहे.चित्र पूर्ण केल्याचं एक निराळं समाधान मनाला मिळतं. चित्रकलेविषयी एक दुर्दैवी गोष्ट अशी, की या कलेकडे इतर देशात जितकं गांभीर्यानं पाहिलं जातं, तेवढं महत्त्व आपल्या देशात चित्रकलेला दिलं जात नाही. चित्रकला करताना मला एक कविता सुचली ती तुम्हाला ऐकवायला मला नक्की आवडेल...आत काहीबाही असतं लपलेलं खोलखोल तळाशी....शोधलं की सापडतं.खूपणारं, बोचणारं, अबोध,दुर्बोध...तळ ढवळला की कळतात  रंग, मनावर उमटलेल्या डागांचे..मग कळतं रंगांनाही असतात वेदना,वैफल्य,आनंद,सुखं आणि त्यांची भाषाही...त्या भाषेला लिपी फक्त रंगांचीच ..रंगांनाही असते सावली आणि त्यात असतात लपलेले इंद्रधनू..त्याचा मैत्र फक्त सूरांशी...असच तळ ढवळताना सापडले लहानपणी हाताला लागलेले रंग..अजून तसेच होते... मनावर ओढलेल्या ओरखड्यातल्या रक्ता सारखे ताजे..तेच म्हणाले मला.. व्यक्त रे बाबा आता आमच्यातूनही.

Web Title: Vaibhav Mangle Hobby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.