ठळक मुद्देउर्वशीने एकटीने तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ अतिशय चांगल्याप्रकारे केला. तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिच्या मुलांचे फोटो पाहायला मिळतात. 

उर्वशी ढोलकिया सध्या आपल्याला नच बलिये या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. ती तिचा पूर्व प्रियकर अनुज सचदेवासोबत या कार्यक्रमात झळकत असून ती वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे या कार्यक्रमात परत आली आहे. उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ सहा वर्षांची असताना ती लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर तिने देख भाई देख या प्रसिद्ध मालिकेत काम केले. उर्वशीने घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली कोमोलिकाची भूमिका चांगलीच गाजली होती.

उर्वशीचे लग्न ती अगदी लहान असताना म्हणजेच वयाच्या 16 व्या वर्षी झाले होते. ती केवळ सतरा वर्षांची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला क्षितीत आणि सागर अशी दोन मुलं आहेत. लग्नाच्या काहीच महिन्यानंतर तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला. उर्वशीचे कोणासोबत लग्न झाले होते हे तिने कधीच मीडियामध्ये न सांगणेच पसंत केले. उर्वशीने एकटीने तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ अतिशय चांगल्याप्रकारे केला. तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिच्या मुलांचे फोटो पाहायला मिळतात. 

उर्वशी अनुजसोबत नात्यात असल्याची मीडियात अनेकवेळा चर्चा होत होती. पण त्या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत मीडियात काहीही न बोलणेच पसंत केले होते. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येत असे. ते दोघे लग्न करतील असे वाटत असतानाच त्या दोघांचे ब्रेकअप झाले. अनुजपेक्षा उर्वशी मोठी असल्याने आणि त्यातही तिला दोन मुले असल्याने अनुजची आई या नात्यासाठी तयार नव्हती असे म्हटले जाते. उर्वशी आणि अनुज यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अनेक महिन्यानंतर स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने सांगितले होते की, मला या नात्याबद्दल कधीच बोलायचे नव्हते. मी माझ्या खाजगी आयुष्याविषयी कधीही न बोलणेच पसंत करते. पण आता मी अनेक महिन्यांनी सांगत आहे की, आम्ही दोघे नात्यात होतो.


Web Title: Urvashi Dholakia's Love Life Ahead Of 'Nach Baliye 9', she got Married At 16 Only To Be A Single Mom Later
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.