दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या उर्वशी ढोलकीयाने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज तिच्या फोटोच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे. ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

याआधीही विविध फोटोमधून आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ केलं होतं. आता या तिच्या मॉर्निंग सेल्फीलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. 

त्यामुळे उर्वशीचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.सध्या उर्वशी कोणत्याही मालिकेत झळकत नसली तरी तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे उर्वशीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही


उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ सहा वर्षांची असताना ती लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर तिने 'देख भाई देख' या प्रसिद्ध मालिकेत काम केले. उर्वशीने 'घर एक मंदिर', 'कभी सौतन कभी सहेली', 'कही तो होगा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे मिळाली होती.

 


'कसौंटी जिंदगी की' मालिकेत कोमोलिकेच्या भूमिकेतून उर्वशी प्रकाझोता आली होती. या भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर ‘बिग बॉस सिझन ६’ ची ती विजेत बनली. बिग बॉसच्या घरात स्पर्धक बनत तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले होते.


वयाच्या 16 व्या वर्षीच उर्वशीचे लग्न झाले होते. ती केवळ सतरा वर्षांची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला क्षितीत आणि सागर अशी दोन मुलं आहेत. लग्नाच्या काहीच महिन्यानंतर तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला.

 

उर्वशीचे कोणासोबत लग्न झाले होते हे तिने कधीच मीडियामध्ये न सांगणेच पसंत केले. उर्वशीने एकटीने तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ अतिशय चांगल्याप्रकारे केला. तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिच्या मुलांचे फोटो पाहायला मिळतात.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Urvashi Dholakia beautiful Morning Selfie captivated the fans, Even the fans did not take their eyes off it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.