ठळक मुद्देउदितच्या बोलण्यातून एक गोष्ट तर नक्कीच कळली की, कपिल एका भागासाठी तब्बल एक कोटी इतके मानधन घेतो. 

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. हा कार्यक्रम नेहमीच टिआरपी रेसमध्ये देखील पहिल्या दहामध्ये असतो. आता या कार्यक्रमाबाबत एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

द कपिल शर्मा या कार्यक्रमात कपिल शर्मा हा सर्वेसर्वा असून त्याच्या कॉमिक टायमिंगने तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कपिलला त्याच्या या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी कपिल किती पैसे घेतो हे तुम्हाला माहीत आहे का? कपिल या कार्यक्रमासाठी किती पैसे घेतो हे या कार्यक्रमातील एका भागात प्रेक्षकांना नुकतेच कळले आहे. या कार्यक्रमात नुकतीच उदित नारायणने त्याची पत्नी आणि मुलगा आदित्य नारायणसोबत हजेरी लावली होती. उदितने या कार्यक्रमात मजा-मस्ती केली आणि एवढेच नव्हे तर मजा मस्ती करत असताना कपिल एका भागासाठी किती मानधन घेतो हे देखील सगळ्यांना सांगितले. 

द कपिल शर्मा शो मध्ये उदित नारायण यांच्या चेहऱ्याच्याबाबत कपिलने एक खास कमेंट केली. कपिल म्हणाला की, तुमचा आवाज खूपच गोड असून तुमचा चेहरा अतिशय निरागस आहे. तुम्हाला पाहून तम्ही आजपर्यंत कोणाचे पैसे बुडवले असतील असे मला तरी वाटत नाही. पण तुमचे पैसे लोकांनी नक्कीच बुडवले असतील असे कपिल म्हणाला. कपिल असे म्हणताच उदित नारायण यांनी क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले की, तुला तर स्ट्रगलची गरजच नाही. मी असे ऐकले आहे की, तू एका भागासाठी तब्बल एक कोटी रुपये होते. हे ऐकताच सेटवर असलेली मंडळी खळखळून हसायला लागली. पण उदितच्या बोलण्यातून एक गोष्ट तर नक्कीच कळली की, कपिल एका भागासाठी तब्बल एक कोटी इतके मानधन घेतो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Udit Narayan says Kapil Sharma earns Rs 1 cr per episode of The Kapil Sharma Show, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.