Tv telugu tv actress kondapalli shravani commits suicide harassed by exboyfriend | तेलगू टीव्ही अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी माजी प्रियकरावर कुटुंबाने लावेल गंभीर आरोप

तेलगू टीव्ही अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी माजी प्रियकरावर कुटुंबाने लावेल गंभीर आरोप

तेलगू इंडस्ट्रीतील अभिनेत्री श्रावणी हिने मंगळवारी रात्री तिच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियांनी सांगितली की ती बेडरुममध्ये गेली आणि दरवाजा बंद केला. कुटुंबीयांनी याप्रकरणी तिचा माजी प्रियकर देवराजा रेड्डीवर तिला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितले कुटुंबियांनी याआधीही त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि श्रावणीला तिच्यासोबत फिरु नको असे देखील सांगितले होते. 

 देवराजविरोधात तक्रार दाखल
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, प्राथमिक तपासात असे कळले आहे की, देवराजसोबत फिरण्यावरुन मंगळवारी रात्री श्रावणीचे आई आणि भावसोबत बाचाबाची झाली होती. यानंतर ती आपल्या रुममध्ये गेली आणि गळफास घेतला. पोलिसांनी देवराजला अटक करण्यासाठी आंध्रप्रदेशमधील काकीनाडा शहरात एक टीम पाठवली आहे. श्रावणीच्या कुटुंबियांनी त्याच्यावर आरोप लावले आहेत त्यामुळे आम्ही त्याला अटक करुन चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
कुटुंबाचा आरोप
देवराज काही महिन्यांंपूर्वी टिक-टॉकच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या संपर्कात आला होता. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. श्रावणीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की देवराजने तिला पैशांसाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती. तो तिचा वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत ​​होता म्हणून कुटुंबियांनी गूगल पेच्या माध्यमातून देवराजला 1 लाख रुपये दिले. पैसे घेतल्या नंतर पुन्हा त्याने श्रावणीला त्रास देण्याची सुरुवात केली असे आरोप कुटुंबाने केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी तक्रारीमध्ये फोटो किंवा व्हिडीओचा कोणताच उल्लेख नसल्याचे सांगितले आहे. श्रावणीने मनसू ममता आणि मौनारागम या मालिकांमध्ये काम केले आहे. ती गेली 8 वर्षे मालिकांमध्ये काम करत होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tv telugu tv actress kondapalli shravani commits suicide harassed by exboyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.