tv kumkum bhagya indu daasi aka zarina roshan khan passes away | दु:खद : ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री जरीना रोशन खान यांचे निधन

दु:खद : ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री जरीना रोशन खान यांचे निधन

ठळक मुद्देजरीना रोशन खान यांना टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कुमकुम भाग्य’ यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्री जरीना रोशन खान यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
गेल्या महिन्यापर्यंत जरीना शूटींग करत होत्या. त्य एकदम फिट होत्या. अशात त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सगळ्यांना धक्का बसला आहे.

आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये जरीना यांनी टीव्हीच्या अनेक मालिकांमध्ये काम केले. शिवाय काही चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र त्यांना खरी ओळख दिली ती छोट्या पडद्याने. छोट्या पडद्यावरच्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत त्यांनी इंदू दासीची व्यक्तिरेखा साकारली होती.


 

जरीना रोशन खान यांना टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री स्मृती झा हिने जरीना रोशन यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या मस्तीत थिरकताना दिसत आहेत.  अभिनेता शब्बीर अहुलुवालिया यांनीही रोशन यांच्यासोबतचा एका क्यूट सेल्फी शेअर केला आहे. ‘ये चांद सा रोशन चेहरा...’, असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tv kumkum bhagya indu daasi aka zarina roshan khan passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.