'साथ निभाना साथिया' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत रूचाने राशी ही भूमिका साकारली होती.  आपल्या आईसह मिळून गोपीविरोधात कटकारस्थानं करणारी राशी  अशी तिची भूमिका होती. तरीही या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. याच मालिकेमुळे रूचाला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली होती.

या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर रूचाने 26 जानेवारी  2015 मध्ये बॉयफ्रेंड राहुलसोबत लग्नगाठीत अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. दोघांचा विवाह मराठमोळ्या पध्दतीने पार पडला होता. साथ निभाना साथिया मालिकेतील  स्टारकास्टने रूचाच्या लग्नात हजेरी लावली होती.

लग्नाच्या चार वर्षानंतर  दोघांच्या  जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दोघांच्या जीवनात एक बाळ आलं आहे.  आपल्या या लाडक्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून रूचाने ही खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे. रूचाने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. ही बातमी शेअर करताचा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.

तसेच पती राहुलही नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर आणि पिता झाल्याच्या भावनेने फारच भावुक झाला होता. पिता झाल्यामुळे जबाबदारी आणखी वाढल्याचंही तो म्हणतो. सध्या रूचा प्रसिद्धी आणि झगमगाटाच्या दुनियेपासून दूर राहून आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. रूचाच्या चाहत्यांना तिने पुन्हा तिच्या कामाला सुरूवात करावी अशी इच्छाही व्यक्त करत आहेत.मात्र अजुनतरी कमबॅक करण्याचे कोणतेही प्लॅनिंग नसल्याचे तिने म्हटले असून आता मुलीचे बालपण एन्जॉय करायचे आहे. असेही तिने म्हटले आहे. 

Web Title: Tv Actress Rucha Hasabnis aka Rashi blessed with a baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.