अग्गंबाई सासूबाई TRPच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका अव्वल स्थानावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:47 PM2019-08-01T18:47:30+5:302019-08-01T18:52:41+5:30

निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक आणि रवी पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच आठवड्यात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. 

Tujhyat Jeev Rangala rank first in BARC India | अग्गंबाई सासूबाई TRPच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका अव्वल स्थानावर?

अग्गंबाई सासूबाई TRPच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका अव्वल स्थानावर?

googlenewsNext
ठळक मुद्देब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, तुझ्यात जीव रंगला ही मालिका गेल्या आठवड्यात पहिल्या स्थानावर होती. आता या आठवड्यात सुद्धा या कार्यक्रमाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, तुझ्यात जीव रंगला ही मालिका गेल्या आठवड्यात पहिल्या स्थानावर होती. आता या आठवड्यात सुद्धा या कार्यक्रमाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. या मालिकेत आलेला ट्विस्ट लोकांना चांगलाच आवडत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत हार्दिक जोशी आता राजा राजगोंडा ही भूमिका साकारत असून त्याची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. मालिकेतील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांना आवडत असून यंदाच्या आठवड्यात देखील तुझ्यात जीव रंगला ही मालिका बार्कच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असल्याने या मालिकेचे फॅन्स खूश होणार यात काहीच शंका नाही.

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर होती. पण तुझ्यात जीव रंगला या मालिकेने या मालिकेला मागे टाकले. गेल्या दोन आठवड्यांपासून ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या क्रमांकावर चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न असून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.


स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

पाचव्या क्रमांकावर आता नव्या मालिकेची एंट्री झाली आहे. निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक आणि रवी पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच आठवड्यात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. 

Web Title: Tujhyat Jeev Rangala rank first in BARC India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.