troll asks benafsha soonawalla why she does not commit suicide bigg boss 11 contestant reports cyber cell | तू आत्महत्या का नाही करत? युजरच्या प्रश्नाने भडकली अभिनेत्री बेनाफ्शा सूनावाला, म्हणाली...

तू आत्महत्या का नाही करत? युजरच्या प्रश्नाने भडकली अभिनेत्री बेनाफ्शा सूनावाला, म्हणाली...

ठळक मुद्देबेनाफ्शाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बिग बॉस 11 ची स्पर्धक होती.  

बिग बॉसच्या 11 व्या सीझनमध्ये दिसलेली बेनाफ्शा सूनावाला हिला अलीकडे एका विचित्र स्थितीचा सामना करावा लागला. होय, चाहत्यांसोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये एक युजर असा काही बोलला की बेनाफ्शाचा पारा चढला. मग काय, तिने थेट सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.

आता हे काय प्रकरण आहे ते जरा जाणून घेऊ. तर बेनाफ्शा अलीकडे इन्स्टावरच्या चाहत्यांसोबत लाइव्ह चॅट करत होती. यावेळी एका चाहत्याने तिला भलताच प्रश्न केला. होय, ‘तू आत्महत्या का करत नाहीस?’ असा हा प्रश्न होता. हा प्रश्न पाहून बेनाफ्शाची तळपायाची आग मस्तकात गेली. हा प्रश्न विचारणा-या युजरला तिने सणसणीत उत्तर दिले.

‘जगभरातील लोक सध्या कोरोनामुळे त्रस्त आहेत. लोक मानसिक आजारांशी लढत आहेत. गरीब व्यक्ती बेरोजगार झाला आहे आणि तू हे काय विचारत आहेस ? असे प्रश्न विचारण्याआधी एकदा विचार करायला हवा.’ असे बेनाफ्शाने त्याला सुनावले. लिहिणाºयाला हे लिहिण्यापूर्वी लाज वाटायला हवी होती. माणुसकी कुठे गेली? असा संतप्त सवालही तिने केला. 

आपल्या या कमेंटमध्ये तिने सायबर पोलिसांनाही टॅग केले. मी सायबर पोलिसांकडे तक्रार करतेय ते माझ्यासाठी नाही. अशा बकवास करणाºया लोकांना सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे. पण या अशा लोकांनी यापुढे अन्य कुठल्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तिला लक्ष्य करू नये, म्हणून मी हे पाऊल उचलतेय, असेही तिने लिहिले.
 

बेनाफ्शाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बिग बॉस 11 ची स्पर्धक होती.  एमटीव्ही इंडियावर व्हिजेच्या रुपात तिने करिअरची सुरुवात केली होती. बेनाफ्शा 2016 मध्ये रोडीज 4 मध्येदेखील झळकली आहे. बेनाफ्शा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय आहे. तिने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: troll asks benafsha soonawalla why she does not commit suicide bigg boss 11 contestant reports cyber cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.