आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे टीव्हीची चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिक रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी तिची ओळख आता इंडस्ट्रीत बनत आहे. तिच्या या सेक्सी अंदाजावर नेटकरी फिदा झालेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. सोशल मीडियावर ती सध्या खूप अॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच योगासन करत फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोंना पाहून चाहत्यांनी खूप कौतुक केले होते. सध्या ती अभिनयात फारशी सक्रीय नसली तरी वर्कआऊट आणि इतर गोष्टी करण्यात वेळ देत असते.  फिटनसे फ्रिक  अभिनेत्रीच्या यादीत लवकरच कविताचे नाव सामिल होणार यांत काही शंकात नाही. तसेच सोशल मीडियावर तिचा 6 लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे. 


कविता अभिनेता नवाब शहासोबत रिलेशनशिपमध्ये होती.पाच वर्ष नात्यात राहिल्यानंतर दोघांनी संगमताने आपल्या नात्याला पूर्णविराम दिला होता. आपल्या आई वडिलांना नाराज करून लग्न करणार नसल्याचे दोघांचे मत होते. त्यानंतर रोनित कविता कौशिकच्या आयुष्यात आला आणि त्या दोघांनी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली. कविता आणि रोनित यांच्यात चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते.

 

लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते.मी  माझ्या मुलावर कुठलाही अन्याय करू इच्छित नाही. 40 व्या वर्षी मी आई होणार असेल तर  माझा मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत मी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असेन. केवळ 20 व्या वर्षी  माझ्या मुलावर त्याच्या म्हाता-या आई - वडिलांची जबाबदारी यावी हे मला नको आहे असे कविताने सांगितले होते. 

Web Title: Trending :Kavita kaushik's hot look on beach made fans crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.