TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 18:15 IST2019-07-19T18:15:00+5:302019-07-19T18:15:00+5:30
दरआठवड्याला टीआरपी रेटिंगची आकडेवारी येते आणि कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे समजतं. मात्र यावेळेला टीआरपीच्या रेटिंगमध्ये एक बदल पहायला मिळालं.

TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री
दरआठवड्याला टीआरपी रेटिंगची आकडेवारी येते आणि कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे समजतं. मात्र यावेळेला टीआरपीच्या रेटिंगमध्ये एक बदल पहायला मिळालं. हा बदल काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. टॉप पाचमध्ये दरवेळी झी मराठीच्या बातम्या पहायला मिळतात. मात्र झी मराठीचा हा रेकॉर्ड मोडीत काढत टॉप पाचमध्ये कलर्स मराठीची एन्ट्री होणार आहे. पाचव्या नंबरवर कलर्स मराठी वाहिनीची बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका आली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पाचव्या स्थानावर चला हवा येऊ द्या शो होता. पण यावेळी पहिल्या पाचमध्ये कलर्स मराठीला स्थान मिळालं असून बाळूमामाच्या नावानं चांगभलं पाचव्या नंबरवर आली आहे. संत बाळूमामा यांच्या आयुष्यावर ही मालिका आधारीत आहे.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुला पाहते रे या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ईशा विक्रांत सरंजामेचा बदला घेणार, त्याला शिक्षा देणार म्हणता म्हणता तिला आता विक्रांतबद्दल हळुवार भावना निर्माण होताना दिसतेय. विक्रांतही ईशावर खरं प्रेम करतोय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे ही मालिका चौथ्या स्थानावर आली आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी गेल्या वेळेप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तर तुझ्यात जीव रंगला मालिकेत आता नवं वळण आलं आहे. राणादाचं बदलेलं रूप प्रेक्षकांना भावत आहे. राणादाबरोबर मालिकेचाही मेकओव्हर होतोय. त्यामुळे ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
यावेळीदेखील माझ्या नवऱ्याची बायको पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात दर दर भटकणारा केविलवाणा गुरू, शनाया आणि राधिकानं त्याच्याकडे फिरवलेली पाठ याच गोष्टी सुरू राहिल्या आणि प्रेक्षकांचाही चांगला रिस्पॉन्स मिळाला.