मालिकेत बबिताचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. बबितावर लट्टू झालेल्या जेठालालप्रमाणे रसिकही तिच्या लूकवर फिदा होतात. बबिता अर्थात मुनमुन दत्ताही रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही ती खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात राहते.  आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा  कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.


सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. तिथे आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते. मुनमुन दत्ताने पुन्हा तिचे फोटोशूट  केले आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत. मुनमुनने या फोटोत हॉट स्पार्कली ड्रेस घातला आहे. . या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे फोटो काहीसे वेगळे ठरत आहेत.याधीही तिने  विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. त्यामुळे मुनमुनच्या या फोटोंवरही चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकरत आहे. तिने कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Web Title: 'Tarak Mehta Ka Ulta Chashma' Fame Babita Aka Munmun Dutta Breathtaking Stunning Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.