Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: पुन्हा टप्पू आणि बबीताजी दिसले सोबत, व्हायरल झाला नवा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:07 PM2021-10-23T13:07:51+5:302021-10-23T13:08:43+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : काही दिवसांपूर्वीच बबीताजी आणि टप्पू यांचं रिअल लाइफमध्ये अफेअर सुरू असल्याची चर्चा होती होती. आता दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Taarak mehta ka ooltah chashmah : Tappu and Babitaji were seen togather, photo goes vira | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: पुन्हा टप्पू आणि बबीताजी दिसले सोबत, व्हायरल झाला नवा फोटो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: पुन्हा टप्पू आणि बबीताजी दिसले सोबत, व्हायरल झाला नवा फोटो

Next

टीव्हीवरील मोस्ट पॉप्युलर कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' ने अनेक वर्षांपासून TRP लिस्टमध्ये टॉप ३ नंबर कब्जा जमवला आहे. १३ वर्षापेक्षा जास्त काळापासून हा शो  लोकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेतील भूमिका लोकांच्या मनात इतक्या बसल्या आहेत की, भूमिका खऱ्या वाटतात. अनेकदा लोकप्रियता कलाकारांना स्टारडम देते तर अनेकदा काही नुकसानही पोहोचवते. काही दिवसांपूर्वीच बबीताजी आणि टप्पू यांचं रिअल लाइफमध्ये अफेअर सुरू असल्याची चर्चा होती होती. आता दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मालिकेत बबीताजीची भूमिका मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका राज अनादकट साकारतात. दोघांना वेगवेगळ्या पिढ्यातील दाखवण्यात आलं आहे. पण जेव्हा दोघांच्या अफेअरची बातमी समोर आली तर लोकांना हे काही रूचलं नाही. सोशल मीडियावरून दोघांना फार ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच दोघांचा एक फार जवळ असलेला फोटो व्हायरल झाला आहे. 

 

या फोटोत मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि राज अनादकट (Raj Anadkat) चा लूक भारी दिसत आहे. आता पुन्हा एकदा या फोटोमुळे त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू होऊ शकते. कारण बऱ्याच दिवसांनी त्यांनी एकत्र फोटो शेअर केला. काही लोकांना दोघांचा हा फोटो फार आवडला तर काही लोकांनी दोघांना ट्रोलही केलं.
अफेअर नसल्याचं दिलं होतं स्पष्टीकरण

जेव्हा दोन्ही कलाकारांच्या अफेअरची बातमी व्हायरल झाली तेव्हा मुनमुन दत्ताने आपल्या पर्सनल आयुष्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. तिने ही बातमी केवळ एक अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच राज यानेही अफेअरची बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं.
 

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah : Tappu and Babitaji were seen togather, photo goes vira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app