स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपण्यापूर्वी मालिकेच्या टीमला मिळाली ही गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 01:32 PM2020-02-03T13:32:11+5:302020-02-03T13:43:12+5:30

Marathi Serial's TRP Rating (January 2020) : 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका संपण्यापूर्वी आता या मालिकेच्या टीमला आणि फॅन्सना एक खूप चांगली बातमी मिळाली आहे.

swarajya rakshak sambhaji is on number one on BARC chart | स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपण्यापूर्वी मालिकेच्या टीमला मिळाली ही गुड न्यूज

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपण्यापूर्वी मालिकेच्या टीमला मिळाली ही गुड न्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.

'स्वराज्य रक्षक संभाजी' ही अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका आता प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. 2018 ला सुरू झालेल्या या मालिकेने रसिकांच्या मनावर जवळपास दोन वर्षं अधिराज्य गाजवले. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. ही मालिका संपण्यापूर्वी आता या मालिकेच्या फॅन्सना एक खूप चांगली बातमी मिळाली आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

अग्गंबाई सासूबाई ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात दुसऱ्या स्थानावर होती. यंदाच्या आठवड्यात देखील ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना चांगलेच आवडत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. पण यंदाच्या आठवड्यात या मालिकेचा टीआरपी ढासळला आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम चौथ्या नंबरवर असून या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

नुकतीच सुरू झालेली लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. ही मालिका गेल्या कित्येक आठवड्यांपासून पहिल्या पाचमध्ये आहे.

Web Title: swarajya rakshak sambhaji is on number one on BARC chart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.