बिग बॉस मराठी ३, दिवस पाचवा: स्पर्धकांसाठी असणार खास सरप्राईज आणि बरच काही..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:30 AM2021-09-24T11:30:10+5:302021-09-24T11:36:21+5:30

बिग बॉस मराठीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. बिग बॉसने पहिल्यांदाच सदस्यांना टेम्पटेशन रुमची पहिली झलक दाखवली.

Surprise awaited on 5th day of Big Boss Marathi 3 for contestant, check what's interesting | बिग बॉस मराठी ३, दिवस पाचवा: स्पर्धकांसाठी असणार खास सरप्राईज आणि बरच काही..

बिग बॉस मराठी ३, दिवस पाचवा: स्पर्धकांसाठी असणार खास सरप्राईज आणि बरच काही..

Next

बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना नुकतचं सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राईझ मिळालं आहे. बिग बॉस मराठीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. बिग बॉसने पहिल्यांदाच सदस्यांना टेम्पटेशन रुमची पहिली झलक दाखवली. या रुममध्ये असणार आहेत सदस्यांसाठी बरीच सरप्राईझेस आणि  टेम्पटेशन. फोनबूथचीही सुविधा देण्यात आली आहे.  ज्याद्वारे सदस्य बाहेर जगातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतील. 

तसेच असणार आहेत खाण्याचे विविध पदार्थ जे बिग बॉसच्या घरात सदस्यांसाठी उपलब्ध नसतात. बायोस्कोप असणार आहे, ज्यामधून सदस्य घराच्या आत डोकावू शकतील. पावर कार्ड, बुक ऑफ टेम्पटेशन आता या दोघांमध्ये काय गुपित दडलेलं आहे, त्यांची काय ताकद आहे ते सदस्यांना त्या रूममध्ये गेल्यावरच कळणार आहे. त्यामुळे या भागातही अनेक रंजक गोष्टी घडणार आहेत.

घरात जय आणि उत्कर्ष हे दोन स्पर्धक आता इतर स्पर्धकांचा वापर करत वेगळाच कट रचताना दिसले. घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक प्लॅनिंग करत आहेत. बिग बॉसकडून मिळालेले टास्क कसेही करुन जिंकायचा यावरच प्रत्येक स्पर्धकाचे लक्ष आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक कसा आहे याविषयी जय आणि उत्कर्ष दोघेही चांगलेच निरीक्षण करताना दिसले. हळूहळ शो आता रंगत आहे.स्पर्धक आता एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत. 

घरात नुकतीच एक स्पर्ध पार पडली. 'फॅशन शोभेल तुला' टास्कमध्ये अखेर उत्कर्षनेच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.या स्पर्धेत आणखी रंगत आणली ती  विकास आणि मिनलच्या भन्नाट डान्सने.''हृदयी वसंत फुलताना गाण्यावर'' या दोघांनीही ठेका धरला होता. तर दादुसच्या गाण्यानं घरातलं वातावरण अगदी बदलून टाकलं होतं. 

तसेच स्पर्धकासांठी येणारे पुढचे टास्कही अतिशय कठीणच असणार आहेत. कॅप्टनपदासाठी नवा टास्क होणार आहे.कोण होणार बिग बॉसच्या घराचा कॅप्टन यावकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे ? या स्पर्धकांमध्ये मीरा मात्र आता वेगळ्याच विचारात आहे.तिला पूर्ण घराचा ताबा मिळवायचा आहे. यासाठी ती खूप मेहनतही घेत आहे. मीराला घराचा ताबा मिळवण्यात यश येईल का ?एकमेकांसह भिडणारे हे स्पर्धक आता घरात टिकून राहण्यासाठी आणखी काय करतील हे पाहणेही रंजक असणार आहे. 

Web Title: Surprise awaited on 5th day of Big Boss Marathi 3 for contestant, check what's interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app