ठळक मुद्दे मुंबईतील एका प्रख्यात हॉस्पिटलमधील कर्करोगपीडित मुले त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना समर्थन देण्यासाठी सेटवर आले होते आणि त्यामुळे सेटवर त्यांचा वेळ अतिशय मजेत गेला.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांचा सगळ्यात आवडता कार्यक्रम असून छोट्या स्पर्धकांच्या विलक्षण नृत्य अविष्काराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक दमदार परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे विजेतेपद आता कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत असून दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावतात. आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.


 
सुपर डान्सरच्या या भागात देखील स्पर्धक आणि त्यांच्या गुरूंनी प्रस्तुत केलेल्या दमदार सादरीकरणाने परीक्षक आणि प्रेक्षकांना रोमांचित केले आणि काही अगदी खास मुलांकडून त्यांना उत्तेजन मिळाले. मुंबईतील एका प्रख्यात हॉस्पिटलमधील कर्करोगपीडित मुले त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना समर्थन देण्यासाठी सेटवर आले होते आणि त्यामुळे सेटवर त्यांचा वेळ अतिशय मजेत गेला. सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा ‘सुपर डान्सर पर्व 3’चे परीक्षक शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू यांना कळले की, केईएम हॉस्पिटलमधील कर्करोगपीडित मुले सुपर डान्सर या कार्यक्रमातील त्यांच्या आवडत्या गुरू-शिष्य जोडीला पाठिंबा देण्यासाठी सेटवर आले आहेत, तेव्हा त्यांनी मुलांबरोबर थोडा वेळ व्यतीत केला. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तसेच त्यांना काही विनोद सांगितले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्पर्धकांनी देखील या मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवला. आपल्या आवडत्या स्पर्धकांना प्रत्यक्ष भेटायला मिळाल्यामुळे ती मुले अतिशय खूश झाली होती.”


 
प्रेक्षकांना ‘सुपर डान्सर 3’ या कार्यक्रमाचा हा भाग शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Super Judges Shilpa Shetty,Geeta Kapur and Anurag Basu welcomes surprise visitors on the set of Super Dancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.