गीता ‘माँ’नं कोणाच्या नावाचं लावलं कुंकू? जाणून घ्या त्या व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:16 PM2021-05-18T17:16:19+5:302021-05-18T17:19:18+5:30

Geeta Kapur revealed the truth : कोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता खुद्द गीताने यावर खुलासा केला आहे.

super dancer 4 judge geeta kapur sindoor picture now she revealed the truth | गीता ‘माँ’नं कोणाच्या नावाचं लावलं कुंकू? जाणून घ्या त्या व्हायरल फोटोमागचं सत्य

गीता ‘माँ’नं कोणाच्या नावाचं लावलं कुंकू? जाणून घ्या त्या व्हायरल फोटोमागचं सत्य

googlenewsNext
ठळक मुद्देगीताने   फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, तीस मार खां आणि तेरे नाल लव हो गया सारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे.

छोट्या पडद्यावर गीता मां या नावाने प्रसिध्द असलेली कोरियोग्राफर गीता कपूरने (Geeta Kapur) गुपचूप लग्न केल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. कारण काय तर तिने व्हायरल झालेले फोटो. खुद्द गीताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले होते.  (Super Dancer 4 judge Geeta Kapur sindoor picture )
तीन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोत गीताने लाल रंगाचा अनारकी सूट घातला होता आणि आश्चर्य म्हणजे तिच्या भांगात कुंकू होते. फोटोत ती अगदी नववधूप्रमाणे दिसली होती. शिवाय या फोटोंमध्ये #Bride असा हॅशटॅगही तिने दिला होता.
गीताचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले होते. गीताने गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर आता खुद्द गीताने यावर खुलासा केला आहे.

एका दैनिकाशी फोनवरून दिलेल्या मुलाखतीत गीताने या फोटोंमागचे सत्य सांगितले आहे. सर्वप्रथम लग्नाची चर्चा तिने फेटाळून लावली. ‘मी अजिबात लग्न वगैरे केलेले नाही, लग्न केले असते तर मी अजिबात लपवले नसते आणि मी लग्न करूच शकत नाही. काही महिन्यांपूर्वी मी माझ्या आईला गमावले. त्यामुळे मी लग्न केल्याच्या चर्चा खोट्या आहेत. मी ते फोटो शेअर केलेत. पण ते सुपर डान्सरच्या (Super Dancer 4 ) येणा-या एपिसोडसाठी होते. या फोटोत माझ्या भांगात कुंकू आहे. मी नववधूसारखी सजलेली आहे. पण हे सगळे शोसाठी होते. या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या एव्हरग्रीन हिरोईन्सला ट्रिब्युट दिले जाणार आहे. त्यामुळे मी रेखाजींसारखी तयार झाले होते. मी रेखाजींची किती मोठी फॅन आहे, हे सगळ्यांच ठाऊक आहे. रेखाजी सिंदूर लावतात, म्हणून मी सुद्धा लावला,’ असेही गीताने स्पष्ट केले.
मी भगवान शिवाची खूप मोठी भक्त आहे. त्यामुळे प्रत्येक सोमवारी पूजेनंतर मी सिंदूर लावते. याआधी अनेकदा मी सिंदूर लावला आहे, असेही तिने स्पष्ट केले.

गीताने वयाच्या अवघ्या 15 वर्षी फराह खानचा ग्रुप जॉइन केला होता. यानंतर तिने फराहसोबत कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम,  मोहब्बते, कल हो न हो, 'ओम शांति ओम  सोबतच अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणून काम केले. ऐवढेच नाही तर तिने चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केलेय. गीताने   फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, तीस मार खां आणि तेरे नाल लव हो गया सारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे.

 यासोबतच  टीव्हीवर डांस इंडिया डांस,  डीआईडी लिल चँप्स्स  आणि इंडियाज डांसिंग सुपरस्टार या शोजची ती जज आहे.
 काही काळापूर्वी गीता राजीव खिंचीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. गीता आणि राजीवचे सोशल मीडियावरील काही फोटोज पाहून काही मीडिया रिपोर्ट्सने हा दावा केला होता. परंतू गीता किंवा राजीव दोघांनीही या बातम्यांवर बोलणे टाळले होते.

Web Title: super dancer 4 judge geeta kapur sindoor picture now she revealed the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.