कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या शोमधील कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर ही जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. सुनीलने या शोच्या पहिल्या सिझनद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले. पण या कार्यक्रमाच्या एका खास भागाच्या चित्रीकरणासाठी सिडनीला ही टीम गेली असता सुनील आणि कपिलची विमानात भांडणं झाली होती. कपिलने सुनीलला चांगलेच सुनावले होते. आणि त्यामुळे सुनीलने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. आता सुनील या शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. कारण तसं सूचक ट्विट त्याने नुकतंच केलं आहे.

सुनील ग्रोव्हरने ट्विटमध्ये म्हटलंय की, प्रत्येक गोष्ट येणार आहे. काहीही कायमचे राहणार नाही. म्हणून फक्त कृतज्ञ राहा आणि हो, खळखळून हसा. बाकी… मेरे हस्बंड मुझको….
द कपिल शर्मा शो’मध्ये सुनीलने साकारलेल्या रिंकू भाभीच्या भुमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. त्यादरम्यान त्याने एक म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित केला होता. ‘मेरे हस्बंड मुझको पियार नहीं करते,’ असे त्या गाण्याचे बोल होते.

सुनीलच्या ट्विटमध्ये याच गाण्याचा उल्लेख पाहायला मिळतोय. त्यामुळे तो कपिल शर्माच्या शोमध्ये परतणार आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


सुनीलसोबत झालेल्या वादानंतर कपिल शर्माने बऱ्याचदा स्पष्टीकरण दिलं होतं. शोमधून सुनील बाहेर पडल्यानंतर कपिल शर्माला जणू उतरती कळाच लागली होती.

कपिल शर्मा व्यसनाधीन झाला होता आणि सोनी टीव्हीने त्याला काही काळ विश्रांतीसाठीसुद्धा दिला. जवळपास वर्षभरानंतर तो कपिलने पुनरागमन केलं आणि सध्या त्याचा शो चांगलाच चर्चेत आहे.


Web Title: Sunil Grover returns to 'The Kapil Sharma' show?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.