Station Master Salman Khan to ‘speed up’ the Bigg Boss journey | बिग बॉस 13 सिझनचा पहिला प्रोमो झाला शूट, सलमान बजावणार ही भूमिका
बिग बॉस 13 सिझनचा पहिला प्रोमो झाला शूट, सलमान बजावणार ही भूमिका


रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी  दबंग सलमान खान पुन्हा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉस-१3 या लवकरच सुरू होणार आहे. यासाठी आता सारेच उत्सुक असून यंदा कोणते चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव आणि विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद अशा अनेक घडामोडी पाहणे रसिकांना आवडते.


या रोमांचक प्रवासाची सुरूवात सलमान खान करणार असून, स्पर्धकांना त्यांचे कौशल्य दाखवावे लागणार आहे कारण आधीपेक्षा ठिकाण जवळ असणार आहे. बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये सर्व सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे, आणि त्या पंच मुळे सुरूवातीपासूनच सीझनचा मनोरंजनाचा बार उंचावला जाणार आहे.  


शोच्या राज्यकर्त्या होस्ट सलमान खानने नुकताच एक प्रोमो शूट केला आहे ज्यात तो स्टेशन मास्टराच्या वेशात आहे आणि नवीन सीझनची घोषणा करत आहे. केबिनमध्ये बसलेल्या रेल्वेच्या हादऱ्यांनी हलणारा सलमान नवीन सीझनची संकल्पना आणि अपेक्षेप्रमाणे तो वेगवान शो कसा बनणार आहे हे स्पष्ट करताना दिसणार आहे. स्टेशन मास्टरचा वेश आणि टोपी परिधान करून सलमानने प्रोमो मध्ये स्वतःचा तडका घातला आहे त्यामुळे तो गंमतीदार बनला आहे. 

Web Title: Station Master Salman Khan to ‘speed up’ the Bigg Boss journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.