social media users lashes out neha kakkar and makers for santosh anand in indian idol | टीआरपीसाठी गरिबीची थट्टा? संतप्त नेटकर्‍यांनी घेतला नेहा कक्करचा क्लास

टीआरपीसाठी गरिबीची थट्टा? संतप्त नेटकर्‍यांनी घेतला नेहा कक्करचा क्लास

ठळक मुद्देअन्य एका युजरनेही नेहाला ट्रोल केले. मदत ऑफ कॅमेरा करायला हवी होती. सेटवर बोलावून नाही. जगासमोर मदत करण्यासाठी नेहा व्यक्तिश: भेटून त्यांना मदत देऊ शकली असती, असे या युजरने लिहिले.

एक प्यार का नगमा है..., जिंदगी की ना टूटे लडी... असे सदाबहार गाणी लिहिणारे सुप्रसिद्ध गीतकार संतोष आनंद नुकतेच ‘इंडियन आयडल’मध्ये दिसले. यावेळी संतोष आनंद यांना पाहून केवळ ‘इंडियन आयडल’च्या सेटवरचेच नाही तर त्यांना टीव्हीवर पाहणारे प्रेक्षकही भावूक झालेत. ‘इंडियन आयडल’ची जज नेहा कक्कर तर ढसाढसा रडली. यादरम्यान तिने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत केली. पण नेहाची ही ‘ऑन कॅमेरा’ मदत अनेकांना रूचली नाही. लोकांनी यावरून नेहालाच नाही तर ‘इंडियन आयडल’च्या मेकर्सलाही जबरदस्त ट्रोल केले. टीआरपीसाठी तुम्ही आणखी किती खालची पातळी गाठणार? असा संतप्त सवाल युजर्सनी केला.

‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर आलेल्या संतोष आनंद यांनी त्यांची सध्याची परिस्थिती आणि मुलगा व सुनेबद्दल सांगितले. त्यांनी सांगितेली कर्मकहाणी ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावले. यादरम्यान नेहा कक्करने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत देऊ केली. तुमची नात समजून हे पैसे घ्या, असे नेहा संतोष आनंद यांना म्हणाली. पण नेटकर्‍यांना कदाचित हे रूचले नाही.   टीआरपीसाठी मेकर्सनी गरिबीची थट्टा केल्याचा आरोप अनेक नेटक-यांनी केला.

यादरम्यान काही लोकांनी यावर उलटसुलट चर्चा सुरु केल्या. भीक मागून संतोष आनंद दिवस ढकलत असल्याच्या बातम्याही उमटल्या. या खोट्या बातम्यांवर गीतकार मनोज मुंतशीर यांनी संताप व्यक्त केला. मीडिया बातमी विकण्यासाठी इतकी नीच पातळी गाठतो, हे पाहून लाज वाटते, असे ट्विट त्यांनी केले. मात्र त्यांच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सनी नेहा व चॅननला ट्रोल करणे सुरु केले.

‘नेहा सारखे अर्ध्या डोक्याची माणसं एका मोठ्या शोमध्ये अशाप्रकारे पैसे वाटणार असेन, तर मीडिया आणखी काय लिहिणार? संतोष आनंद यांच्याबद्दल अशा बातम्या उमटल्या असतील तर यात चॅनलही दोषी आहे. संतोष आनंद यांना ट्रिब्युट देण्यासाठी बोलवले होते, आम्ही किती महान आहोत हे दाखवण्यासाठी नाही,’ असे आदित्य शाही नावाच्या एका युजरने लिहिले.

अन्य एका युजरनेही नेहाला ट्रोल केले. मदत ऑफ कॅमेरा करायला हवी होती. सेटवर बोलावून नाही. जगासमोर मदत करण्यासाठी नेहा व्यक्तिश: भेटून त्यांना मदत देऊ शकली असती, असे या युजरने लिहिले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: social media users lashes out neha kakkar and makers for santosh anand in indian idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.