सोशल मीडिया स्टार ते 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी, आहे तरी कोण ही चिमुरडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:43 PM2021-09-14T14:43:13+5:302021-09-14T14:43:44+5:30

रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या या चिमुरडीचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे.

From social media star to 'Rang Mazha Vegla's Kartiki, who is this girl? | सोशल मीडिया स्टार ते 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी, आहे तरी कोण ही चिमुरडी?

सोशल मीडिया स्टार ते 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी, आहे तरी कोण ही चिमुरडी?

Next

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा लवकरच लीप घेणार आहे. मालिका काही काळ पुढे लीप घेतल्यामुळे कार्तिक आणि दीपाच्या मुली थोड्या मोठ्या दाखवण्यात येणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला त्यात या दोन्ही मुली एकत्र खेळताना दिसल्या मात्र त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत हे अजूनही त्यांना कळलेले नाही.

रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिक दीपिकाचा सांभाळ करतो आहे तर दीपा कार्तिकीचा सांभाळ करताना दिसत आहे. या दोन्ही मुलींमुळे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील का याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारबद्दल जाणून घेऊयात. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे साईशा भोईर. 


साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा आणि तिचे कुटुंब कल्याणला वास्तव्यास आहे. तिचे वडील विशांत भोईर यांना म्युजिकची आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे.

साईशा युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओ अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओंना चाहत्यांकडून पसंती देखील मिळताना दिसते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नृत्य, अभिनय याशिवाय साईशा कुकिंग करतानाचे व्हिडीओज देखील शेअर करताना दिसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता त्यात साईशा महत्वाची भूमिका साकारताना दिसली होती. साईशाची आई पूजा कदम भोईर आपल्या लेकीला नेहमीच प्रोत्साहन देताना दिसते. याचमुळे साईशा कला क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: From social media star to 'Rang Mazha Vegla's Kartiki, who is this girl?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app