Singer Neha Kakkar Gave 2000-2000 Rupees To Childrens, see her video | बाबो..! दोन-दोन हजारांच्या नोटा रेस्टॉरंटच्या बाहेर वाटताना दिसली ही प्रसिद्ध गायिका, See Video

बाबो..! दोन-दोन हजारांच्या नोटा रेस्टॉरंटच्या बाहेर वाटताना दिसली ही प्रसिद्ध गायिका, See Video


बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाला घेऊन चर्चेत आली होती. ती गायक व अभिनेता आदित्य नारायण सोबत लग्न करणार असल्याचे वृत्त चर्चेत आले होते. इतकंच नाही तर इंडियन आयडॉल ११च्या सेटवरून दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर आदित्यने खुलासा केला होता की, हे सर्व फक्त शोच्या टीआरपीसाठी केले होते. या शोमध्ये नेहा परीक्षकाच्या भूमिकेत आहे. 


आता या सगळ्यात नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत नेहा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसते आहे. ती बाहेर आल्यावर काही चाहते तिला तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी विचारत आहेत आणि नेहाने त्यांच्यासोबत सेल्फीदेखील काढली. त्यादरम्यान तिथे काही मुले आली आणि ते तिच्याकडे पैसे व खाण्यासाठी काहीतरी मागताना दिसत आहेत. त्यानंतर नेहा जे काही केले ते पाहून चाहते शॉक झाले आहेत.
नेहा स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने पर्समधून पैसे बाहेर काढले. नेहा त्या मुलांना २०००च्या नोटा वाटताना दिसते आहे. नेहाने दोन दोन हजारांच्या नोटा दोन मुलांना देऊन त्यांना आपापसात वाटून घ्यायला सांगितल्या.  नेहाचा हा व्हिडिओ विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


नेहाचा उदारपणा पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. युजर्स म्हणत आहे त की ती खूप विनम्र स्वभावाची आहे. एकाने लिहिलंय की किती छान वाटते आहे.

याच व्हिडिओत पहायला मिळतंय की नेहा पैसे दिल्यानंतर तिच्या कारजवळ गेली आणि तिथे एक मीडिया पर्सन तिच्या मागे गेला. तिला विचारलं की लग्न कधी करणार आहेस? त्यावर हे ऐकून ती हसू लागली आणि उत्तर न देताच पुढे निघून गेली 

Web Title: Singer Neha Kakkar Gave 2000-2000 Rupees To Childrens, see her video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.