ठळक मुद्देपलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. पलक तिवारी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या डेब्यूची चर्चा सुरु होती अखेर मुहूर्त सापडला आहे. पलक  ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिकेतून डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. मध्यंतरी पलक ‘कसौटी जिंदगी की2’ मालिकेत प्रेरणाच्या भूमिकेसाठी पलक तिवारीला विचारणा झाली होती, अशी बातमी मध्यंतरी होती. खुद्द श्वेताच्या हवाल्याने मीडियाने ही बातमी दिली होती. प्रेरणाच्या भूमिकेसाठी  पलकला विचारण्यात आले. पण पलकनेच ही आॅफर धुडकावून लावली, असे सांगितले गेले होते. पुढे या बातमीवर  ‘कसौटी जिंदगी की2’ची निर्माती एकता कपूरने नाराजीही व्यक्त केली होती. एकताच्या या संतापानंतर श्वेताला असे काहीही नसल्याचा खुलासा करावा लागला होता.

या मालिकेच्या नायकाच्या भूमिकेत शाहीर शेख असून अभिनेत्री  रिया शर्मा ही त्याची नायिका असेल. या मालिकेतून श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या शोच्या निर्मात्यांना असे वाटते की पलक ह्या शोमधील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. तिचे अभिनय कौशल्य पाहुन पलक निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे. त्यांना आशा आहे की तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडेल आणि ते तिच्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडतील.”

ये रिश्ता क्या कहलाता है!’ या गाजलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका सुरू होणार आहे. 'ये रिश्ते है प्यार के उत्तम कथानक आणि स्टारर कास्टला घेऊन चर्चेत आहे.  

Web Title: Shweta Tiwari’s daughter, Palak to make her television debut on yeh rishtey hain pyaar ke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.