Shubhra mother in law marriage date is fix in agabainsasubai | Agga Bai Sasubai Serial : अखेर ठरला शुभ्राच्या सासूबाईंचा लग्नसोहळ्याचा मुहूर्त!

Agga Bai Sasubai Serial : अखेर ठरला शुभ्राच्या सासूबाईंचा लग्नसोहळ्याचा मुहूर्त!

अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. मालिकेच्या कथेतील नाविन्य, मालिकेची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. मालिका आता एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. 

आजोबा आता आसावरी आणि अभिजीतच्या लग्नासाठी होकार देणार आहेत. आतापर्यंत आजोबांनी या लग्नाला नकार दिला होता. त्यांच्या परवानगीनेच आसावरी आणि अभिजीत यांच्या लग्नाची लगबग चालू झाली आहे.  येत्या रविवार १९ जानेवारी या दिवशी लग्नाचा मुहूर्त निघाला आहे. 

विशेष म्हणजे आजोबा स्वतः असावारीचं कन्यादान करणार असून शुभ्रा ही आपल्या लाडक्या सासूबाईंची करवली होणार आहे.  हा लग्नसोहळा अविस्मरणीय असेल यात शंकाच नाही. अभिजीत आणि आसावरी ही दोन्ही पात्र साकारणाऱ्या निवेदिता सराफ आणि गिरिश ओक या कलाकारांचं सध्या प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येत आहे.  शुभ्राच्या 'सासूबाईं'चा आता कसा असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shubhra mother in law marriage date is fix in agabainsasubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.