'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील शकु उर्फ शुभांगी गोखलेंना लेकीचं पत्र पाहून कोसळलं रडू, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:39 PM2021-05-11T20:39:25+5:302021-05-11T20:40:17+5:30

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे शूटिंग सिल्व्हासा येथे सुरू आहे. नुकतेच या सेटवर एक वेगळंच चित्र पहायला मिळाले.

Shubhangi Gokhale get emotional on Yeu Kashi Tashi Mi Nandayla set | 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील शकु उर्फ शुभांगी गोखलेंना लेकीचं पत्र पाहून कोसळलं रडू, व्हिडीओ व्हायरल

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील शकु उर्फ शुभांगी गोखलेंना लेकीचं पत्र पाहून कोसळलं रडू, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. तसेच शूटिंगलाही बंदी घालण्यात आली. त्यामुळे बऱ्याच मालिकांचे शूटिंग इतर राज्यात सुरू आहे. झी मराठी वाहिनीवरील मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे शूटिंग सिल्व्हासा येथे सुरू आहे. या मालिकेची सर्व टीम बायो बबलचे पालन करत आहेत. मदर्स डेच्या दिवशी सेटवर एक वेगळंच चित्र पहायला मिळाले. सेटवर केक व एक भावनिक पत्र आले आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.

अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक आणि अभिनेत्री सखी गोखले हिने मदर्स डे निमित्त केकसोबत एक पत्र सेटवर पाठवले होते. या पत्रात सखीने म्हटले की, अम्मा शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शुभांगी भुजबळ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद.


हे पत्र वाचल्यानंतर शुभांगी गोखले भावनिक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. शुभांगी गोखलेंची इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले की सखीनी प्रॉडक्शन टीमची मदत घेऊन या शुभेच्छा पाठवल्या. तीने एक गोड पत्र ही पाठवलं..युनिटमधल्या सगळ्या आयांसाठी.. त्यानंतर बायो बबलचा एक टीअर बबल झाला! आयांना मुलांच्या आठवणीनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं..सखी,या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं

Web Title: Shubhangi Gokhale get emotional on Yeu Kashi Tashi Mi Nandayla set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.