बिग बॉस मराठी 3; दिवस चौथा: घरात सुरु वेगळीच कारस्थानं, एका स्पर्धका विरोधात रचली जाते खेळी, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:21 PM2021-09-23T12:21:42+5:302021-09-23T12:22:09+5:30

बिग बॉस मराठी ३ मध्ये घरात आज टास्कसोबतच जबरदस्त कार्यक्रम रंगणार आहे.उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह हिने पुरुषांचा गेटअप परिधान केल्याचे पाहायला मिळणार आहे.

shocking twist in BiggBoss marathi 3 contestant Jai And Utkarsh planning New Game With This Contestant, Know who is he | बिग बॉस मराठी 3; दिवस चौथा: घरात सुरु वेगळीच कारस्थानं, एका स्पर्धका विरोधात रचली जाते खेळी, कोण आहे तो?

बिग बॉस मराठी 3; दिवस चौथा: घरात सुरु वेगळीच कारस्थानं, एका स्पर्धका विरोधात रचली जाते खेळी, कोण आहे तो?

Next

बिग बॉस मराठीच्या घरात दर दिवशी नाही दर मिनिटाला नाही तर सेंकदाला स्ट्रॅटेजि बदलत असतात. यामध्ये कोणाचा गेम काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगण खूप कठीण असतं. प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना, स्वत:ला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजि आखताना दिसणार आहेत. आता तो नक्की कोणाबद्दल आहे ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.


 
जय उत्कर्ष बोलताना दिसणार आहे, “तिला आपण सहज आपल्या बाजुने करु शकतो. दुसरी सदस्याला अजून इतक्या लवकर नको बाहेर काढूया,बडबड बडबड आहे ती, तितकीच कॉमेडी कंटेंट आहे. उत्कर्ष म्हणाला, “त्याला पण आता नको बाहेर काढूया. पुढच्या खेळीसाठी ठेऊया. जय पुढे म्हणाला, “दर शोला एक जोकर लागतो तो जोकर आहे .

 

त्याचा वीक पॉइंट आपल्याला माहिती आहे लगचे इमोशनल ब्रेकडाऊन होतो त्याचा. त्याला जास्त दिवस भाव नाही ना दिला तर तो एकटा पडणार. त्याला विचारायचे नाही, नको त्या कल्पनाही द्यायची गरज नाही. आता हे दोघे ज्या स्पर्धकांबद्दल खेळी आखतात. “तो” नक्की कोण आहे ? कोण आहे घरातला जोकर ? कोणाबद्दल जय आणि उत्कर्ष बोलत आहेत हे कळेलच.

आगामी भागात स्पर्धक एकमेकांची नक्कलही करताना दिसणार आहेत. सोनाली गायत्री दातारची नक्कल करताना दिसणार आहे. दिवसेंदिवस अधिकच घरातले तापमान चांगलेच तापणार आहे.बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांमध्ये खरी स्पर्धा सुरू झालेली दिसून येते आहे. 


 
घरात आज टास्कसोबतच  जबरदस्त कार्यक्रम रंगणार आहे.उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह हिने पुरुषांचा गेटअप परिधान केल्याचे पाहायला मिळणार आहे.विकास पाटील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर मीनल शाह सोबत नृत्य सादर करणार आहेत. तर उत्कर्ष शिंदे सुरेखा कुडची यांच्यासोबत ही पोरगी साजूक तुपातली या गाण्यावर धम्माल डांस करणार आहेत.

Web Title: shocking twist in BiggBoss marathi 3 contestant Jai And Utkarsh planning New Game With This Contestant, Know who is he

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app