तुला पाहते रे मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेतील ईशा निमकर व विक्रांत सरंजामे आणि इतर पात्रांवर रसिकांना भरभरून प्रेम केलं. वर्षभरात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. आजही या मालिकेतील कलाकारांना चाहते मिस करत आहेत. त्यात आता या मालिकेतील ईशा म्हणजेच गायत्री दातार हिला सोशल मीडियावर दुसऱ्यांदा वाईट अनुभव आला आहे. तिला इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा एका व्यक्तीने फोटोवर अश्लील भाषेत मॅसेज पाठवला आहे. गायत्री दातार हिने हा अश्लील मॅसेज तिच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. 

गायत्री दातार हिने तिच्या फोटोवर आलेल्या अश्लील मॅसेजचा फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. तिने या व्यक्तीविरोधात इंस्टाग्रामवर रिपोर्ट करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. त्यात तिने एका पोस्ट मध्ये खंत व्यक्त करत लिहिले की, बऱ्याच लोकांमध्ये खूप नकारात्मकता आहे फक्त माझ्याबद्दल नाही तर विशेष करून महिलांबद्दल. हे खूप धक्कादायक आहे. फक्त द्वेष नाही तर अश्लील कमेंट्स व मेसेज पाठवणे हे खूप शॉकिंग आहे.

गायत्री हिने त्या व्यक्तीचे प्रोफाईलदेखील इंस्टा स्टोरीवर शेअर केले आहे. गायत्रीला अशाप्रकारे अश्लील मॅसेज येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील तिला अशा मॅसेजचा सामना करावा लागला होता. 

यापूर्वी गायत्रीला एका महिलेनेच अश्लील मॅसेज पाठवला होता. त्यावेळी देखील तिने सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा प्रकार उघडकीस आणला होता.

'तुला पाहते रे' या मालिकेनं निरोप घेतल्यानंतर गायत्रीने निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले होते.


त्यानंतर आता सध्या ती डान्सिंग क्वीन या डान्स रिएलिटी शोमध्ये पहायला मिळते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Tula Pahate re Fame Gayatri Datar received vulgar comments and messages on photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.