Shocking! salman khan quit bigg boss 13 hosting because of his bad health | Bigg Boss 13 : Shocking! शूटींग नाही तर या आजारामुळे सलमान खान सोडतोय ‘बिग बॉस 13’!!
Bigg Boss 13 : Shocking! शूटींग नाही तर या आजारामुळे सलमान खान सोडतोय ‘बिग बॉस 13’!!

ठळक मुद्देसूत्रांचे मानाल तर  ‘बिग बॉस 13’ हे सलमानचे कदाचित शेवटचे सीझन असेल.

 सलमान खान  ‘बिग बॉस 13’ हा शो सोडणार म्हटल्यावर चाहते निराश आहेत. ‘बिग बॉस 13’ लांबल्यामुळे तारखांचा मेळ घालणे जमत नसल्याने सलमान हा शो सोडणार, असे मानले गेले. पण प्रत्यक्षात हा शो सोडण्यामागे तारखा नाही तर सलमानचे आजारपण हे कारण असल्याचे कळतेय.
होय, हा शो सोडण्यामागे तारखा, शूटींग हे कारण नाहीच. तर प्रकृती हे खरे कारण आहे. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार,  ‘बिग बॉस 13’ होस्ट करताना सलमान प्रचंड ताण घेतो. एकीकडे बिझी शेड्यूल आणि दुसरीकडे या शोमुळे वाढलेला ताण यामुळे सलमानच्या प्रकृतीवर परिणाम जाणवू लागला आहे. अशात सलमानने कुठल्याही प्रकारचा ताण घ्यावा, हे कुटुंबाला मान्य नाही. 

सलमान खान दीर्घकाळापासून ट्रिरेमिनल न्युरेलजिया या आजाराने ग्रस्त आहे. या आजारात अधिक ताण वा क्रोध प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतो.  ‘बिग बॉस 13’च्या एका एपिसोडमध्ये अरहानच्या खोटारडेपणा पाहून सलमान इतका संतापला होता की, त्याने त्याचे जॅकेट रागाने भिरकावले होते. हा इतका ताण सलमानसाठी योग्य नाही, असे खान कुटुंबाचे मत आहे. त्याचमुळे सलमानने हा शो सोडावा, यासाठी कुटुंबाचा दबाव वाढतो आहे.
सूत्रांचे मानाल तर  ‘बिग बॉस 13’ हे सलमानचे कदाचित शेवटचे सीझन असेल. खरे तर अनेकदा हा शो सोडण्याचा विचार सलमानने केला होता. पण प्रत्येकवेळी मेकर्सच्या मनधरणीमुळे सलमानने हा विचार बदलला. मात्र आता कुटुंबाचा वाढता दबाव बघता सलमानने हा शो सोडण्याचा पक्का निर्धार केला आहे.  

सध्या ‘बिग बॉस 13’बद्दल प्रेक्षकांमध्ये असलेला उत्साह पाहता शोच्या मेकर्सनी फिनाले काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बिग बॉस 13’चा फिनाले येत्या 12 जानेवारीला होणार होता. मात्र आता हा 16 फेब्रुवारीला या शोचा फिनाले एपिसोड प्रसारित केला जाणार असल्याचे कळतेय.  

Web Title: Shocking! salman khan quit bigg boss 13 hosting because of his bad health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.