SHOCKING: पुन्हा चव्हाट्यावर आले शशांक आणि तेजश्रीचे नाते, हे आहे त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:53 AM2020-03-16T11:53:56+5:302020-03-16T11:58:20+5:30

जान्हवी साकारणारी तेजश्री प्रधान आणि श्री साकारणारा शशांक केतकर रसिकांचे लाडके बनले. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच तेजश्री आणि शशांक यांच्यात जवळीक वाढली होती.

SHOCKING : Real Reason Behind Shashank Ketkar And Tejashree Pradhan Divorced-SRJ | SHOCKING: पुन्हा चव्हाट्यावर आले शशांक आणि तेजश्रीचे नाते, हे आहे त्यामागचे कारण

SHOCKING: पुन्हा चव्हाट्यावर आले शशांक आणि तेजश्रीचे नाते, हे आहे त्यामागचे कारण

googlenewsNext

ते  जवळ आले आणि पुन्हा दूर गेले. त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.. तितकी ब्रेकअपचीही... दोघांची जोडी रसिकांनी डोक्यावर  घेतली होती. छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती जोडी म्हणजे जान्हवी आणि श्री. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहचली. अल्पावधीतच जान्हवी साकारणारी तेजश्री प्रधान आणि श्री साकारणारा शशांक केतकर रसिकांचे लाडके बनले. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच तेजश्री आणि शशांक यांच्यात जवळीक वाढली. आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयामुळे रसिकही खूप खूश होते. मात्र रसिकांचा हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. 


कारण लग्नानंतर वर्षभरातच शशांक आणि तेजश्री यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्यामुळे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला. अवघ्या एका वर्षातच दोघांनी वेगळ्या होण्याच्या निर्णयावर आश्चर्याचा धक्काच बसला होता.  रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या जोडीमध्ये अशाप्रकारे अचानक दुरावा निर्माण झाल्याचे नेमकं कारण काय होते.हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीतच होता. 
मात्र शशांकने या घटस्फोट दाखल केलेल्या अर्जात लिहलं होतं की, तेजश्रीकडून त्याला आणि कुटुंबाला नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते. अनेक गोष्टींमुळे मानसिक छळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्याने त्यात स्पष्ट केले होते. 

तसेच घटस्फोटानंतर शशांकने दुसरं लग्न करत आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली. पेशाने वकील असणा-या प्रियांकासह शशांक पुन्हा रेशीमगाठीत अडकला. वैवाहिक जीवनात खूप खुश असून आपले खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे.  

Web Title: SHOCKING : Real Reason Behind Shashank Ketkar And Tejashree Pradhan Divorced-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.