Shocking! Another actress committed suicide by hanging herself | धक्कादायक! आणखी एका अभिनेत्रीने गळफास लावून केली आत्महत्या

धक्कादायक! आणखी एका अभिनेत्रीने गळफास लावून केली आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला दोन महिने उलटलेले असतानाही अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. तेव्हापासून आत्महत्यांचे सत्र चालूच आहे. आता तेलगू इंडस्ट्रीतील अभिनेत्री श्रावणी हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने मंगळवारी रात्री तिच्या राहत्या घरात गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अयशस्वी प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केलाचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी रात्री सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिने तिच्या एस्सार नगरमध्ये असणाऱ्या मथुरा नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी देवराजा रेड्डी नावाच्या व्यक्तीवर काही आरोप केले आहेत. तो काही दिवसांपासून तिला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी श्रावणीच्या भावाने केली आहे. एस्सार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. टीव्ही9 तेलुगूने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ओस्मानिया हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी नेण्यात आला आहे. 

श्रावणीने मनसू ममता आणि मौनारागम या मालिकांमध्ये काम केले आहे. ती गेली 8 वर्षे मालिकांमध्ये काम करत होती. श्रावणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत आहेत. संशयास्पद मृत्यू अशी या घटनेची नोंद करण्यात आली असून पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे पुढील चौकशी केली जाणार आहे.
सुशांतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना व कलाकारांना धक्का बसला होता. त्याचे पडसाद अद्याप पहायला मिळत आहेत. त्यानंतर 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काही दिवसांनी राजस्थानमधील रेणू नागरच्या बॉयफ्रेंडने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Another actress committed suicide by hanging herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.