shivani baokar Bridal Look Viral On Social Media | सोशल मीडियावर नववधूप्रमाणे नटलेल्या या अभिनेत्रीला ओळखले का ? लग्नाच्या चर्चांना उधाण
सोशल मीडियावर नववधूप्रमाणे नटलेल्या या अभिनेत्रीला ओळखले का ? लग्नाच्या चर्चांना उधाण

छोट्या पडद्यावरील 'लागीर झालं जी' मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. सध्या तिचा ब्रायडल लुकमधला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत शिवानी अतिशय सुंदर दिसत असली तरी शिवानीच आहे का असा प्रश्नही तिच्या फॅन्सना पडत आहे.  नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या शिवानीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 

लेहंगा आणि साजेशी ज्वेलरी आणि मेकअप असा साजश्रृंगार तिने केला आहे. पहिल्यांदाच अशा पेहरावात शिवानी पाहायला मिळत असल्यामुळे अनेकांनी तिला तिच्या लग्नाबद्दलच प्रश्न विचारले आहेत. तर काहींना ती लग्न करत असल्याचेही वाटत आहे. शिवानीचा हा ब्राइडल लुक तिने तिच्या एका फोटोशूटसाठी केलेला आहे.  तिच्या या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच ब्रायडल लुकमध्ये दिसलेली शिवानीच्या या लुकवर चाहते फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती. ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाडपमे आणि बिनधास्तपणे बोलू शकते. जर्मन भाषा शिकण्याचा फायदा तिला नोकरी मिळवण्यातही झाला. त्यामुळे शीतली साकारण्याआधी तिने एका आयटी कंपनीत जर्मन ट्रान्सलेटर म्हणून कामही केलं होतं.

Web Title: shivani baokar Bridal Look Viral On Social Media

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.