Shiv Thackeray's 'B Real' fund to stay fresh all day long! | शिव ठाकरेचा दिवसभर फ्रेश राहण्याचा 'बी रिअल' फंडा !

शिव ठाकरेचा दिवसभर फ्रेश राहण्याचा 'बी रिअल' फंडा !

बिग बॉस सीजन २ चे विजेतेपद पटकावून संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बनलेला शिव ठाकरे सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. ‘आपला माणूस’ ह्या हॅशटॅगने विशेष ओळखल्या जाणाऱ्या शिवने स्वतःच्या ‘बी-रियल’ ब्रॅण्डची घोषणा केली आहे. त्याच्या सोशल मीडिया साईटवर त्याने ‘बी-रियल’चा लोगो शेअर करत, त्याची माहिती दिली. बी रीयल हा एक डिओड्रंट ब्रॅण्ड असून, नेहमीच उत्साही आणि फ्रेश राहणाऱ्या शिव ठाकरेचा डिओड्रंट फंडा त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.


आपल्या या ब्रांडबद्दल शिव सांगतो की, ‘आपण पाहतो की, ऑफिसला जाणारी मंडळी दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डीओचा वापर करतात. सामान्य माणसाला आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी दिवसभर फ्रेश राहण्यास हा डीओ मदत करेल.

बी रियलची टॅगलाईन सेलिब्रेट करा याच कारणामुळे ठेवण्यात आली आहे. केवळ ऑफिसला जाणारी व्यक्तीच नव्हे तर इतरांनी देखील दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बी रियलचा वापर करावा.”


अमरावती जिल्ह्यात लहानाचा मोठा झालेला शिव ठाकरे याला नृत्यदिग्दर्शक व्हायचं होतं. ते स्वप्न त्यानं पूर्ण केलं. त्यानंतर त्याला 'एमटीव्ही रॉडीज'मध्ये स्पर्धक बनण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो या सीझनचा विजेता ठरला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Thackeray's 'B Real' fund to stay fresh all day long!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.