शीतली उर्फ शिवानी बावकर लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:30 PM2021-09-28T18:30:21+5:302021-09-28T18:30:58+5:30

लवकरच शिवानी बावकर नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Shitali alias Shivani Bawkar will soon be seen in a new role | शीतली उर्फ शिवानी बावकर लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

शीतली उर्फ शिवानी बावकर लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

googlenewsNext

सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून लागिर झालं जी मालिकेत शीतलीच्या भूमिकांतून ती घराघरात पोहचली आहे. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी नवीन मराठी मालिका, कुसुम घेऊन येत आहे.

आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.

२००१ साली हिंदीमध्ये 'कुसुम' नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी रिमेक आहे. तेव्हाही  ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती.

कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल. 


याबद्दल एकता कपूर म्हणाली की, २१ वर्षानंतर 'कुसुम'  प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर 'कुसुम' आणण्याची संधी मला मिळाली. 'कुसुम' ही  मालिका माझा खूप जवळची आहे. २१ वर्षांआधी या मालिकेने सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले होते आणि २१ वर्षांनंतर मराठीमध्ये जेव्हा कुसुम येते आहे, तेव्हाही रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी मला खात्री आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली.


सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज 'कुसुम' मालिका ४ ऑक्टोबर पासून रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

Web Title: Shitali alias Shivani Bawkar will soon be seen in a new role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.