shilpa shinde not getting good offers alleged cintaa | ‘बिग बॉस’ जिंकूनही शिल्पा शिंदेला मिळेना मनासारखे काम, आता केलेत हे आरोप
‘बिग बॉस’ जिंकूनही शिल्पा शिंदेला मिळेना मनासारखे काम, आता केलेत हे आरोप

ठळक मुद्दे‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोकप्रीय झाली होती.

‘बिग बॉस’चे 11 वे सीझन जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेच्या करिअरची गाडी सूसाट सुटेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण असे काहीच झाले नाही. नाही म्हणायला, ‘पटेल की पंजाबी शादी में’ या चित्रपटात एक डान्स नंबर करताना ती दिसली.  काही रिअ‍ॅलिटी शोमध्येही  झळकली. पण यापेक्षा कुठलेही मोठे यश तिच्या पदरी पडले नाही. कामापेक्षा वेगवेगळ्या मुद्यावरच्या वक्तव्यांमुळेच ती अधिक चर्चेत राहिली. ताज्या मुलाखतीत शिल्पा यावर बोलली.  चांगल्या ऑफर्स येत नसल्याचे ती म्हणाली. केवळ इतकेच नाही तर यानिमित्ताने सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात CINTAAवर गंभीर आरोपही केलेत.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने हे आरोप केलेत. ‘अनेक वर्षे मी टीव्हीवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यादरम्यान मला प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. पण अचानक सगळे काही बदलले. मी माझ्या एका शोमधून (भाभीजी घर पर है) बाहेर पडले. त्याहीवेळी माझ्याकडे अनेक ऑफर्स होत्या. पण त्या मनासारख्या नव्हता. एक क्षण तर असा आला की, लोकांना माझ्यासोबत काम करायचेच नाही, असे मला वाटू लागले. माझ्यासोबत कुणीही काम करू नये, हेच CINTAAला हवे होते. अनेक वादानंतर अनेक गोष्टी बदलल्या. पण मला मनासारखे काम मिळाले नाही,’असे शिल्पा यावेळी म्हणाली.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोकप्रीय झाली होती. निर्मात्यांसोबतच्या वादामुळे शिल्पाने ही मालिका मध्येच सोडली होती. या शोच्या निर्मात्यांवर शिल्पाने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तर निर्मात्यांनी CINTAAकडे तक्रार केली होती. यानंतर शिल्पा CINTAAविरोधात मैदानात उतरली होती.  


Web Title: shilpa shinde not getting good offers alleged cintaa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.