Sasural Simar Ka Actor Ashiesh Roy Hospitalize Facing Financial Crunch | टीव्ही अभिनेता करतोय गंभीर आजाराशी सामना, उपचारासाठीही नाहीत पैसे

टीव्ही अभिनेता करतोय गंभीर आजाराशी सामना, उपचारासाठीही नाहीत पैसे

'ससुराल सिमर का' व 'कुछ रंग प्यार के' या मालिकेत अभिनय करून रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता आशीष रॉयची तब्येत बिघडल्यामुळे त्याला गोरेगावमधीस एसआरव्ही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. आशीष सध्या आर्थिक तंगीमुळे त्रस्त आहे. त्याने सोशल मीडियावर त्याची व्यथा मांडली आहे. त्याने पोस्टमध्ये देवाघरी जाण्याबाबत म्हटलं आहे. 


स्पॉटबॉयशी बोलताना आशीष रॉय म्हणाला की, मला रुग्णालयात दाखल केलं आहे. माझी तब्येत ठीक नाही. माझी किडनी नीट काम करत नाही. माझ्या शरीरात जवळपास ९ लीटर पाणी जमा झाले आहे. ज्याला लवकरात लवकर बाहेर काढण्याची गरज आहे. 


आशीष पुढे म्हणाला की, डॉक्टरांनी मला काही औषधे दिली आहेत. मला वाटतं की ४ लीटर पाणी काढलं आहे. पण अद्याप ५ लीटर पाणी काढणं बाकी आहे. बघुयात पुढे काय होते. 


आशीष रॉयला त्याला डायलिसिसची गरज आहे का, असे विचारल्यावर तो म्हणाला की, या गोष्टीचा निर्णय डॉक्टर घेतील. मात्र अद्याप त्याबद्दल काही सांगितलेले नाही. 
आशीष म्हणाला की, सध्या एकटा असल्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यावे लागत आहे. मी एकटा असल्यामुळे अडचणी येत आहेत. मी अद्याप लग्न केलेलं नाही. जीवन सोप्पे नाही.


आशीष सध्या आर्थिक तंगीमुळे त्रस्त आहे. तो म्हणाला की, लकवाग्रस्त झाल्यानंतर मी बरा झालो होतो. मात्र मला काम मिळत नव्हते. आता मी केलेल्या सेव्हिंग्सवर जगत आहे. जे आता संपत येत आहेत. मला वाटतंय की मी आता कोलकाताला शिफ्ट व्हायला पाहिजे. तिथे माझी बहीण राहतो. इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी मला काम दिलं पाहिजे नाहीतर तुम्हाला माहित आहे काय होतं ते.


याशिवाय आशीषने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, सकाळची कॉफी, साखरेशिवाय.. ही स्माईल मजबूरीतील आहे...देवा मला उचल.


आशीष अभिनेत्यासोबतच एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्टदेखील आहे. त्याने हॉलिवूड चित्रपट जोकरला व्हॉईस ओव्हर दिला आहे. याला रसिकांची खूप पसंती मिळाली आहे.


 

Web Title: Sasural Simar Ka Actor Ashiesh Roy Hospitalize Facing Financial Crunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.