ठळक मुद्देलिप फिलर ट्रिटमेंटनंतर तिला अनेक निगेटीव्ह कमेंट्स ऐकाव्या लागल्यात. 

फिट आणि सुंदर दिसण्यासाठी स्टार्स काय काय करतात, हे जाणून घ्यायचे असेल तर टीव्ही अभिनेत्री सारा खान हिचे उदाहरण एकदम परफेक्ट आहे.  ‘बिदाई’ फेम सारा खान हिला देवाने भरभरून सौंदर्य दिले होते. पण आणखी सुंदर दिसण्याच्या नादात बयेने लिप सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि या सर्जरीने तिला देव आठवला. होय, ही सर्जरी करून सारा इतकी पस्तावली की, आपण हा खुळेपणा केलाच का? असा प्रश्न तिला पडतो.  सर्जरीनंतर जवळजवळ वर्षभर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्जरी करण्याचा माझा तो निर्णय मूर्खपणाचा होता, असे आता ही बया म्हणतेय.

लिप सर्जरीनंतर सारा प्रचंड ट्रोल झाली होती. आता ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती या संपूर्ण एपिसोडवर बोलली.
तिने सांगितले, ‘खरे तर मी सुंदर दिसण्यासाठी काहीही केले नाही. पण हो  लिप फिलरचा निर्णय मात्र मी घेतला. लिप फिलरनंतर मी अधिक आकर्षक दिसेल, असा माझा अंदाज होता. पण हे सगळे  माझ्यावरच उलटले. सुंदर दिसण्याऐवजी त्याने माझा सुंदर चेहरा बिघडला. माझे ओठ मलाच आवडले नाहीत. मग ते इतरांना काय आवडणार. या लिप फिलरनंतर वर्षभर मी अनेक अडचणींचा सामना केला. वर्षभर अगदी स्वत:ला आरशात बघण्याची हिंमतही होईना. कसेही करून फिलर कमी व्हावेत, यासाठी वाट पाहण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय राहिला नव्हता. सुदैवाने काळासोबत सगळे काही ठीक झाले आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.’

लिप फिलर ट्रिटमेंटनंतर मला अनेक निगेटीव्ह कमेंट्स ऐकाव्या लागल्यात. आधी याचा प्रचंड त्रास झाला. नंतर मी यावर विचार करणे बंद केले. एक सेलिब्रिटी या नात्याने चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला ऐकाव्याच लागतात. आता माझे ओठ पूर्णपणे ठीक झाले आहेत. मी माझ्या फिटनेसवर लक्ष देतेय, असेही तिने सांगितले.

माझ्या मते, सर्वांना सुंदर दिस्यचा अधिकार आहे. फक्त गरज आहे ती फोकस करण्याची, असेही ती म्हणाली.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sara khan open up about her lip surgery says it was a disaster-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.