गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. संजीदा आणि तिचा पती आमिर अली यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून कानावर येत होत्या. मीडिया रिपोर्टनुसार संजीदा अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करते आहे. हर्षवर्धन आणि संजीदा 'तैश' या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दोघांमधील जवळीक दिवसांदिवस वाढत चालली आहे. दोघे एका इव्हेंटच्या ठिकाणी एकत्र स्पॉट झाले. एक वेबसाईटशी बोलताना संजीदा म्हणाली की, ती आणि हर्षवर्धन राणे फक्त चांगले मित्र-मैत्रिण आहेत. 


2012 मध्ये संजीदा शेख आणि आमिर अली लग्नबंधनात अडकले. मात्र आता यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले आहे. अद्याप दोघांनी घटस्फोट घेतलेला नसला तरी लवकरच संजीदा आमिरला घटस्फोट देणार असल्याची माहिती आहे.


आमिर आणि संजिदा यांना एक मुलगी  आहे. त्यांना मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झाली होती मात्र त्यांनी यागोष्टीला  सगळ्यांपासून  लपवून ठेवली.  


संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तसेच आमिरने देखील अनेक हिट मालिका दिल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjeeda shaikh dating harshvardhan rane gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.