ठळक मुद्देसाक्षीच्या मुलीचे नाव नाव दित्या आहे. साक्षी मुलीला देवी लक्ष्मीचे वरदान मानते. त्यामुळे तिने मुलीचे नाव दित्या ठेवले, जे देवी लक्ष्मीचेच एक नाव आहे. या नावाचा अर्थ प्रार्थनांचे फळ देणारी असा आहे.

साक्षी तन्वरचा आज वाढदिवस असून तिने छोट्या पडद्यावर तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. 'कहानी घर घर की', 'बड़े अच्छे लगते हैं' यासारख्या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री साक्षी तन्वरने गेल्या काही वर्षांत चित्रपट, मालिका, वेबसिरीजमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्याच कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे साक्षीचे चाहते तिच्यावर प्रेम करतात. कहानी घर घर की ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी आजही पार्वती याच नावाने साक्षी ओळखली जाते.

साक्षीने मालिकांप्रमाणेच दगंल, मोहल्ला अस्सी यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचसोबतच ती कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटात देखील झळकली होती. साक्षीने वयाची चाळीशी पार केली असली तरी तिने आजही लग्न केलेले नाहीये. साक्षीचे लग्न झाले नसले तरी ती एका मुलीची आई आहे. तिने काही वर्षांपूर्वी एका मुलीला दत्तक घेतले होते.

साक्षीच्या मुलीचे नाव नाव दित्या आहे. साक्षी मुलीला देवी लक्ष्मीचे वरदान मानते. त्यामुळे तिने मुलीचे नाव दित्या ठेवले, जे देवी लक्ष्मीचेच एक नाव आहे. या नावाचा अर्थ प्रार्थनांचे फळ देणारी असा आहे.

नेहमीच साक्षीच्या लग्नाविषयी मीडियात चर्चा रंगताना दिसते. तिने दिलेल्या एका मुलाखतीत की कधी लग्न करणार याविषयी तिने सांगितले होते. ती म्हटली होती की, मला अजूनपर्यंत असे कुणी नाही मिळाले, ज्याच्याशी मी लग्न करू शकेन. माझा लग्नावर पूर्ण विश्वास असला तरीही योग्य व्यक्ती जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही.

साक्षीच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्यासोबत तिच्या मुलीचे अनेक फोटो पाहायला मिळतात. तिची मुलगी ही खूपच गोंडस आहे. 

Web Title: Sakshi Tanwar adopts baby girl Dityaa before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.