बिग बॉसच्या घरात साक्षीला हवं तेव्हा डॉक्टरांसोबत कन्सल्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरुनच ती प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. इतकेच नाही तर तिने श्वेता तिवारी, वीणा मलिक आणि सारा खानला तिची मासिक पाळी चुकल्याचेही शोमध्ये सांगितले होते. मासिक पाळी न आल्याने अनवाँटेड प्रेग्नेंसीची भीती तिला सतावत होती.मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे म्हणणे काही वेगळेच होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने प्रेग्नेंसीची बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली होती, मी आता फक्त 21 वर्षांची आहे. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी प्रेग्नेंट कशी असू शकते.

 

 


साक्षी प्रधान 'स्प्लिट्सविला' या डेटिंग रिअॅलिटी शोच्या दुस-या पर्वाची विजेती आहे. इतकेच नाही तर तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओत साक्षी एका तरुणासोबत इंटीमेट होताना दिसली होती. याच कॉन्ट्रोव्हर्सीमुळे साक्षीला बिग बॉस या शोची ऑफर मिळाली होती. बिग बॉसमध्ये साक्षी अभिनेता अश्मित पटेलला पॉप्स म्हणून हाक मारायची. स्वतःला ती अश्मितची मुलगी म्हणायची.

मध्यंतरी साक्षी तिच्या टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली होती. तिचे असे फोटो पाहून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव्ह असते. तिचे हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही अधिक वाढ झाली आहे. 

Web Title: Sakshi Pradhan was the victim of Unwanted Pregnancy, Truth was revealed during Bigboss-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.