1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. वाजिद खान यांचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं.

साजिदने नुकताच छोट्या पडद्यावरील ‘इंडियन प्रो म्यूझिक लीग’ या कार्यमक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान त्याने दिवंगत भाऊ वाजिद खानबद्दल अनेक आठवणी सांगितल्या. त्यातला एक किस्सा ऐकून  साऱ्यांचा ऊर भरून आला. 

वाजिदच्या आईने  सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा वाजिदला किडनीचीअतिशय गरज होती. त्या स्वतः मधुमेहाच्या रूग्ण असल्यामुळेस्वतःची किडनी देऊ शकत नव्हत्या.पण तरीही कुठूनतरी किडनी मिळेल याची त्यांना अपेक्षा होती. पण लोकांनी त्यांना मदत केली नाही उलट त्यांना फसवले गेले.

साजिदने सांगितले की, वाजिदची एक किडनी निकामी झाली होती. त्यावेळी कुटुंबातील सर्वांनी वाजिदला किडनी देण्यास नकार दिला होता. त्याचा समोर जीवनमरणाचा प्रश्न होता.अशावेळी माझी पत्नी लुबनाने धाडस करत तिची किडनी वाजिदला दान दिली होती.त्यावेळी लुबनामुळेच वाजिद पुनर्जन्म मिळाला होता असेच मी म्हणेन.कारण अशा कठीण प्रसंगीच लुबनाने खऱ्या अर्थाने त्याला आधार दिला होता.

विशेष म्हणजे लुबनाने कोणालाही न सांगता जाऊन तिच्या सर्व टेस्ट केल्या आणि नंतर किडनी मॅच झाल्याने वाजिदला देण्याचा निर्णय घेतला. लुबनाने देण्याचा विचार केला होता’ असे साजिद-वाजिदची आई रजिना यांनी सांगितले.

वाजिद खानने कोरोनामुळे नाही तर या कारणामुळे घेतला जगाचा निरोप, कुटुंबियांनी केला खुलासा 

१ जून रोजी कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. मुंबईच्या सुराना सेतिया रुग्णालयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

गेल्या वर्षी यशस्वीरित्या त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया पार पडली होती. त्यांनंतर घश्याचा संसर्ग बळावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचदरम्यान वाजिद खानचे निधन झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sajids wife turned angel to Wajid, when the whole family refused to give Wajid a kidney.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.